🌟मिरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबाच्या कंस्ट्रक्शन कंपनीत कागमाराचा मृत्यू....!


🌟याप्रकरणी कामात हयगयी व निष्काळजीपणा केल्याने मृत्यस कारणीभूत झाल्याने पेंटींग ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल🌟

भाईदर : मिरारोड येथील काशिगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या मे. सेव्हन इलेव्हन कन्ट्रक्शन कंपनीच्या अपना घर फेस - ३ येथे काम करताना एक कामगार १६ व्या मजल्यावरून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी कामात हयगयी व निष्काळजीपणा केल्याने मृत्यस कारणीभूत झाल्याने पेंटींग ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बांधकाम कंपनी हि मीरा भाईंदर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबियांची आहे.

शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता कामगार विजय मैत्री हे १६ मजल्यावर कलरचे काम करत केल्यानंतर परांची सोडत असताना त्याठिकाणाहुन पडल्याने मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यास भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले असता त्यास दाखलपूर्व मयत घोषित केले आहे. याप्रकरणी मयत यांचा मुलगा येशू मैत्री यांच्या तक्रारीवरून कलरचे काम करणारे ठेकेदार अंज्याइहा वरकोलु वय ४८ वर्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगारांना आवश्यक असणारे सेफ्टी बेल्ट व सुरक्षा जाळी आणि इतर साहित्य न दिल्यामुळे त्याठिकाणी काम करीत असतांना तक्रारदार यांच्या वडिलांचा पाय घसरून मृत्यू झाल्याने काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💫अपना घर फेस-३ मध्ये ह्यापूर्वीही अनेकांचा जीव जाऊनही ठोस कारवाई नाही :-

ह्याच अपना घर फेस - ३ मध्ये लोखंडी अँगल पडून मयत शुभम सुदांशु दास वय ५ वर्ष ह्याचा मृत्यू झाला होता, तर जयंत दास वय ५ वर्ष हा सुद्धा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर मुकेशसिंह मार्को वय २६ वर्ष यांचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी डबलू ब्रिजलाल यादव वय २२ वर्ष ह्या मजुराच्या डोक्यात वरून दगड येऊन पडून मृत्यू झालेला असताना त्यात आज पुन्हा घटना घडली तरीही पालिका, पोलीस व कामगार प्रशासनाने अजूनही ठोस कारवाई केलेली नाही....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या