🌟नांदेड जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून भविष्यात जिवीत किंवा मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक🌟
नांदेड :- नांदेड शहरातील शहिद स.भगतसिघंजी रोड परिसरातील बाबा दिपसिघंजी नगरच्या प्रवेश मार्गावरील लाईटच्या खांबावरील वायरला आग लागल्याची भयंकर घटना आज शनिवार दि.०४ जानेवारी रोजी सकाळी ०८.०० वाजेच्या सुमारास घडली यावेळी परिसरातील नागरीकांनी सतर्कता दाखवून महावितरण कंपनीला माहिती दिली महावितरण कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यतत्परते मुळे मोठा अपघात होता होता टळला.
लाईटच्या खांबावरील वायरींना आग लागल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या फोन वरून कळविले व कर्मचाऱ्यांनी आपली कुशलता दाखवीत ताबडतोब या भागातील लाईट बंद करून अग्नीशामक दलास बोलावल्या मुळे अग्नीशामक दलाने तत्परतेने आग विझवून टाकली आग विझवण्यास थोडासा जरी विलंब झाला असता तर जवळच लागून असलेल्या निवासस्थानामध्ये देखील आग पसरली असती. आगीचे कारण थंडी मुळे कोणीतरी शेकोटी पेटवल्याने या खांबावरील वायफाई तथा सिसीटीवीच्या वायरच्या तारांना आग लागली असल्याचे बोलले जात आहे.
नांदेड शहरात सर्वत्र इंटरनेट सेवेसाठी व सिसीटीवी कॅमेऱ्यांसाठी जागोजागी लाईटच्या खांबाला मोठ्या प्रमाणात वाईफाई व सिसीटीचे वायर गुंडाळून ठेवलेले आहेत काही ठिकाणी तर मेन लाईन तारांच्या जवळून ह्या तारा ओढलेल्या आहेत वायफाय इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने असंख्य लोक इंटरनेट कनेक्शन घेत आहेत व त्याचा योग्य मोबदला देखील कंपन्यांना देत आहेत परंतु तरी देखील संबंधित कंपन्या वायरांची स्वातंत्र्य व्यवस्था करण्याऐवजी महावितरण कंपनीच्या खांबांवर जागोजागी वायर बांधत असल्यानचे व लाईटच्या खांबावर वायर गोळा करून ठेवत असल्याने याचे दुष्परिणाम जनसामान्यांना भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित वायफाय कंपन्या लाईटच्या खांबांचा वापर करण्यासाठी महावितरण कंपनीला काही मोबदला तर देत नाही ना ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे बाकी परिस्थिती कोणतीही असो परंतु हा सर्व प्रकार अत्यंत धोकादायक आहे. यावर नांदेड जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून भविष्यात यामुळे जिवीत किंवा मालमत्तेचे नुकसान होणार नाही या बाबतीत दक्षता घेणे आवश्यक आहे.
राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर अबचलनगर नांदेड 7700063999
0 टिप्पण्या