🌟परभणी तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे आंदोलन 6 व्या दिवशी माघे....!


🌟निवासी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासना नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित🌟 

परभणी :- परभणी तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप २०२४ चा २५% अग्रीम व २०२१/२०२३ खरीप व रब्बी चा पिक विमा संरक्षण रक्कम आदा करण्यात यावा या मुख्य मागणी सह अन्य मागण्यांसाठी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 24 जानेवारीपासून बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू होते. दिनांक 24 जानेवारी रोजी निवासी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्र व दिनांक 28 जानेवारी रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रातील आश्वासनानुसार इर्शाद पाशा समवेत दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन आज दिनांक 29 जानेवारी रोजी तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2021 मध्ये जिल्ह्यातील 5,28,405 शेतकऱ्यांना रक्कम रु.495.91 कोटी एवढी पिक विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी रक्कम रु.458.26 कोटी एवढी रक्कम वाटप करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम रु.37.65 एवढी रक्कम पिक विमा कंपनीकडुन पोर्टलव्दारे वाटप करण्यासाठी अपलोड करण्यात आली आहे. परंतु काही Technical issue मुळे सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास अडचण येत आहे. सदरील Technical issue दुरुस्त झाल्यानंतर उर्वरित पिक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. या कारणाने ते हे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करीत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या