☸️पुर्णा शहरात देश विदेशातील भिक्खू गणांची उपस्थितीत 22 व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन....!


☸️बोधिसत्व डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पुर्णा यांच्या वतीने बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन☸️

पुर्णा (दि.३० जानेवारी २०२५) पुर्णा शहरातील बुद्ध विहार भदंत उपाली थेरो नगर येथे बोधिसत्व डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पुर्णा यांच्या वतीने शुक्रवार दि.31 जानेवारी व 01 फेब्रुवारी 2025 या दिवशी 22 व्या बौद्ध धम्म परिषद व स्मृतीशेष उपाली थेरो यांचा 42 वा स्मृतिदिन संपन्न होणार आहे. यावेळी देश विदेशातील वंदनीय भिक्षु गण उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे भदंत चंद्र बोधि महाथेरो  यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येईल नांदेड येथील निवृत्त पोलीस अधिकारी ग्रुप नांदेड ध्वजारोहण प्रसंगी मानवंदना देतील. 

सकाळी 10:30 वाजता बुद्ध विहार पूर्णा येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण  करण्यात येईल त्यानंतर बुद्ध विहारात त्रिशरण, पंचशील, सामूहिक त्रिरत्न बुद्ध वंदना व पूजा विधी संपन्न होईल.सकाळी ठीक 11 वाजता भिक्खू संघासह बाहेरगावावरून आलेल्या प्रमुख पाहुण्यासाठी भोजनदान.दुपारी 12:30 वाजता डॉ.आंबेडकर नगर, पूर्णा येथे धम्म ध्वजारोहण माननीय फुन्सुक लढाकी प्रसिद्ध धम्म गायक व बॉलीवूड अभिनेता लेह लडाख यांच्या हस्ते करण्यात येईल.दुपारी 3: 30 वाजता धम्म परिषदेचे उद्घाटन भिक्कू थेर इम चांग वू मुख्य संस्थापक बुलगवाडोंगजोल विहार दक्षिण कोरिया यांच्या हस्ते होईल.परिषदेचे अध्यक्ष म्हणून भिक्खू संघ सेना महाथेरो संस्थापक अध्यक्ष इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर लेह लडाख असणार आहेत.

यावेळी लुम्बिनी स्मरणिकेचे प्रकाशन भिक्कू डॉ. ली. ची.रॅन माजी कुलगुरू कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठ दक्षिण कोरिया यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून मा.रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी परभणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई चेअरमन डॉ एस.पी. गायकवाड,लेह लड्डाक येथील पत्रकार वांग रिमझिन तसेच स्टॅंन झीन जॉय धम्मानंद भिक्खू संघ सेना यांचे खाजगी सचिव उपस्थित असणार आहेत.लूंबिनी स्मरणीकेच्या प्रकाशन नंतर धम्मदेशनेच्या प्रथम सत्राला सुरुवात होणार आहे.धम्मदेशनेचा विषय भगवान बुद्ध अपौरुशतेचा दावा करत नाहीत.भिक्खू शरणानंद महाथेरो (पाथरी) भिक्खू बोधीपालो महाथेरो (चौका), भिक्खू विशुध्दानंद महाथेरो (बुध्दगया),भिक्खू सुमनवन्नो महाथेरो (चंद्रपूर),भिक्खू डॉ. यशकाश्यपायन महाथेरो (जय‌सिंगपूर)

☸️ द्वितीय सत्र :-

(विषय : बुध्द धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यावरच जगलेला आहे")

भिक्खू प्रा.डॉ.एम. सत्यपाल महाथेरो (छ. संभाजीनगर) भिक्खू डॉ. इंदवंश महाथेरो (छ. संभाजीनगर) भिक्खू एस. प्रज्ञाबोधी महाथेरो (मावसाळा) भिक्खू धम्मज्योती थेरो (छ. संभाजीनगर), भिक्खू ज्ञानरक्षित थेरो (छ. संभाजीनगर), भिक्खू धम्मबोधी थेरो (छ. संभाजीनगर), रात्री धम्मदेसने नंतर बुध्द भिमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

☸️ शनिवार दि.०१ फेब्रुवारी, २०२५ रोजी

सकाळी ठीक १०:३० वा. शांतीनगर, पूर्णा येथे मा.प्रा. मोहनराव मोरे (मा. नगराध्यक्ष, पूर्णा) यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व भिक्खू संघाकडुन त्रिशरण-पंचशील सामुहिक त्रिरत्न वंदना, पुजाविधी करण्यात येईल.

सकाळी ठीक ११:३० वा. उत्तम मुगाजी खंदारे यांच्याकडे भिक्खू संघाला भोजनदान व धम्मदेसना होईल.

☸️ प्रमूख धम्मदेसना :-

* प्रथम सत्र दुपारी ०२ वा. *

(विषय : "शीलघात, चित्तघात, दृष्टिघात म्हणजे काय?")

भिक्खू धम्मसेवक महाथेरो (मुळावा)अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिकू संघ भिक्खू पय्यातिस्स थेरो (सिरसाळा) भिक्खू करूणानंद थेरो (छ. संभाजीनगर, 

☸️ द्वितीय सत्र :-

(विषय : "अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे")

भिक्खू पय्यारतन थेरो (विपस्सनाचार्य, नांदेड), भिक्खू पय्याबोधी थेरो (खुरगाव, नांदेड), भिक्खू महाविरो थेरो (काळेगाव, अहमदपूर)

☸️ तृतीय सत्र :-

(विषय : "सन्तुष्टी परमं धनं")

भिक्खू धम्मधर थेरो (जालना) भदन्त रेवत थेरो (बिदर), भिक्खू पय्यानंद थेरो (लातूर), भिक्खू मुदितानंद थेरो (परभणी), भदन्त धम्मानंद थेरो (छ. संभाजीनगर), भिक्खू रत्नदीप थेरो (छ. संभाजीनगर) भिक्खू अस्सजी थेरो (दाभड), भिक्खू धम्मशील थेरो (बीड) भिक्खू सुभूती थेरो (नांदेड), भिक्खू संघपाल थेरो (वाजेगाव)

भिक्खू शीलरत्न थेरो (नांदेड), भिक्खू बोधीधम्मा (धम्माचल, अजिंठा लेणी), भिक्खू शिवली (जालना), भिक्खू सुमेध नागसेन (खरोसा), भिक्खू धम्मसार (किल्लारी), भिक्खू रेवतबोधी (नांदेड), भिक्खू बुध्दभूषण (दाभड), भिक्खू पय्यावर्धन (हिंगोली), भिक्खू पय्यारक्खित (पुणे), भिक्खू संघरतन (देवगांव फाटा), भन्ते बुध्दशील (लातुर), भन्ते पय्याजीत (धम्माचल), भन्ते पय्यावंत (धम्माचल), भन्ते बोधीराज (लातुर)वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती, भारतीय बौध्द महासभा, तालुका शाखा, पूर्णा. व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळाने केले आहे.

 संयोजक : भिक्खु पंय्यावंश, बुध्द विहार, पूर्णा 7385875760

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या