🌟परभणी तालुक्यातील कै.अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालयाकडून राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत ७ दिवसीय विशेष शिबिर....!


🌟कै.अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालयाकडून मौजे पांढरी गावात विशेष शिबिर🌟 

परभणी :- राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन कै.अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालय वरपुड तालुका जिल्हा परभणी यांच्याकडून परभणी तालुक्यातील मौजे पांढरी  या गावामध्ये  ठेवण्यात आलेले आहे सर्वप्रथम पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात ही अशोक बाबाराव तळेकर यांच्या हस्ते योग शिबीर घेऊन करण्यात आली व नंतर जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक यांच्याकडून जनजागृती रॅली संपूर्ण गावातून काढण्यात आली आणि मुख्य कार्यक्रम म्हणजे उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला.

या उद्घाघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अजित वरपुडकर ( संस्था अध्यक्ष कृषी महाविद्यालय वरपुड) व अध्यक्ष ज्ञानोबा माणिकराव पांचाळ (सरपंच,पांढरी),प्रमुख पाहुणे म्हणून जन्न्नाथ शिवाजीराव चव्हाण (उपसरपंच, पांढरी),डॉ.ए.ए.चव्हाण ( संचालक, शिक्षण ), विनोद बापूराव लांडगे (मुख्याधापक, जिल्हा परिषद प्रथानिक शाळा पांढरी),अंगद भगवानराव ढोले ( शालेय व्यवस्थापन समिती, पांढरी),ज्ञानोबा रामराव ढोले (अध्यक्ष तंठा मुक्ती समिती, पांढरी ) व गावातील गावकरी मंडळी  या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाघाटन सोहळा पार पाडण्यात आला या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मोरे आर.एम. तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.रनेर आर.बी. व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद देखील उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या