🌟गरम ब्लॅंकेटचे वाटप जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले🌟
परभणी (दि.०१ जानेवारी २०२४) - परभणी येथील शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा म्हणून 200 गरीब व गरजू महिला व पुरुषांना गरम ब्लॅंकेटचे वाटप जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांतिदुत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍड. अशोक सोनी, प्राचार्य बाळासाहेब जाधव, डॉ. दिनेश भुतडा, प्रा. सुरेश नाईकवाडे, डॉ. रितेश अग्रवाल, डॉ.अब्दुल सलिम, डॉ.सालेहा कौसर, सौ . वर्षा सारडा हे उपस्थित होते.शांतिदुत सेवाभावी संस्था मागील 21 वर्षांपासून दरवर्षी हिवाळ्यात गरजू व गरिबांना गरम ब्लँकेटचे वाटप करण्याचा उपक्रम राबवत आहे. यावेळी बोलताना रवींद्रसिंह परदेशी यांनी शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून गरीब लोकांसाठी शांतिदूत हा उपक्रम राबवत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरिबांसाठी अशा पद्धतीने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी व समाजात एकोपा जपण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी माधव सारडा,शोएब चौउस,शेख नसीर ,अण्णा कंची आदीनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या