🌟वैदिक मंत्रघोषात मानस पुजेसह पुरानोक्त पद्धतीने जन्मोत्सव करण्यात आला साजरा🌟
पुर्णा :- श्री सद्गुरू दाजीमहाराज यांचा १६५ वा जन्मोत्सव आज शनिवार दि.११जानेवारी २०२५ शनिवार रोजी वैदिक मंत्रघोषात मानस पुजेसह पुरानोक्त पद्धतीने साजरा करण्यात आला.
श्री दाजी महाराज संस्थानातून गुरूनाम गजरात श्रींच्या मूर्ती व पादुकांची यज्ञ मंडप,वेदशाळा ते मुख्य सभामंडप पर्यंत सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. अग्रभागी विश्वविख्यात वैदिक प.पू.श्री.गणेश्वर शास्त्री द्रविड (वाराणशी),पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी,संस्थानाधिपती उमेश महाराज टाकळीकर हे होते.वेदमूर्ती अवधूत महाराज यांनी श्रींची मूर्ती व पादुका हाती घेतल्या.शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
व्यासपीठावर पाळण्यात श्रींची मूर्ती व पादुका वैदिक मंत्रघोषात प्रतिष्ठित करण्यात आल्या हभप.कैलाशबुवा खरे व अवधूत महाराज यांनी भजन सेवा सादर केली.त्यानंतर विधिवत पुरानोक्त पद्धतीने मानसपूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर पंडितप्रवर श्री गणेश्वर शास्त्री द्रविड,पंडित अतुलशास्त्री भगरे,आमदार बालाजीराव कल्याणकर,रमण महाराज,गणेश महाराज ,सुरेश महाराज दिनेश महाराज, डॉ .गणेश जोशी सपत्नीक उपस्थित होते
जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री सद्गुरू दाजी महाराज संस्थानचे संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले.सद्गुरू भक्त अनिरुध्द देशमुख यांनी हे संकेत स्थळ विकसित केले आहे .त्याची माहिती डॉ.हरिभाऊ पाटील यांनी दिली....
0 टिप्पण्या