🌟बुलढाणा येथे 16 जानेवारी रोजी मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मिडिया परिषदेची जिल्हास्तरीय बैठक.....!


🌟जिल्ह्यातील यूट्यूब,पोर्टल व न्यूज चॅनलच्या संपादक व पत्रकारांनी बैठकीस उपस्थित राहावे - राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर 

✍️ मोहन चौकेकर

बुलढाणा : मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हास्तरीय बैठक पत्रकार भवन बुलढाणा येथे 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी 01.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 

बदलत्या काळानुसार प्रिंट मिडियासोबतच डिजिटल मिडियाचे महत्त्व आहे.याची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सरांचे मार्गदर्शनात डिजिटल मिडिया परिषदेची शाखा सुरू करण्यात आली. डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्य अध्यक्ष होण्याचा मान अनिल वाघमारे बीड यांना मिळाला. त्याअनुषंगाने राज्यभर डिजिटल मिडिया परिषदेचे संघटन वेगाने उभे करण्याचे काम त्यांनी हाती घेतले असून प्रारंभी बीड जिल्ह्यासह सांगली,सातारा, पुणे,परभणी,कोल्हापूर व आता बुलढाणा जिल्हास्तरीय कार्यकारिणीची निवड करणार आहेत.डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या बैठकीस जिल्ह्यातील संघटनेचा आढावा घेण्यात येईल तसेच मराठी पत्रकार परिषदेचे नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे,बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत व जिल्हा पदाधिकारी यांचा बैठकीत प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. बैठकीत डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणीचे नव्याने गठन करण्यात येणार आहे.बैठकीत घाटाखाली व घाटावर असे दोन विभाग करून दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येईल तरी जिल्ह्यातील यूट्यूब, पोर्टल व न्यूज चॅनलच्या संपादक व पत्रकारांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा प्रभारी तथा राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांनी केले आहे........

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या