🌟महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्टच्या शिबीरातून 1 हजार 770 रक्तदात्यांनी केले रक्तदान....!


🌟राज्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचे अमृत महोत्सवी वर्ष  : जिल्हा असोसिएशनतर्फे संपूर्ण जिल्ह्यात उपक्रम🌟

परभणी :- महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने शुक्रवार 24 जानेवारी रोजी तालुकानिहाय आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 1 हजार 770 दात्यांनी रक्तदान केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके यांनी दिली.

            परभणी येथील श्री मंगल कार्यालयात असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या या शिबीराचे उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मंत्री, सचिव हाके यांनी या शिबिरामागील भूमिका विशद केली. या शिबीराच्या यशस्वीतेकरीता अनिल हराळ, दत्ता गाडगे, गोविंद शर्मा, शेख अजीम, वैजनाथ दहिफळे, निसार खान, त्याचबरोबर पालम येथील प्रवीण शिरसकर, गंगाखेड येथील प्रदीप गुंडाळे, संदीप कोटलवार, नंदू भरड, सोनपेठ येथील सुरेश लोढा, पाथरी येथील ज्ञानोबा वाघ, बाबा टेंगसे, मानवत येथील संजय नाईक, दिगंबर वाकळे, जिंतूर येथील गजानन दरगड, पूर्णा येथील अजय ठाकूर व ताडकळस येथील गिरीश पत्रे, पेडगाव येथील अभय देशमुख तेथील शिबीरे यशस्वी करण्याकरीता प्रयत्न केले.

           दरम्यान, राज्यातील 1 लाख औषधी विक्रेत्यांची ही असोसिएशन शिस्तबध्द अशी संघटना आहे. विशेषतः अध्यक्ष शिंदे यांचे औषध वितरण प्रणाली व आरोग्य शिबीरात मोठे योगदान आहे. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर औषधांच्या उपलब्धतेबाबत शिंदे यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. अशा या व्यक्तीमत्वाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने वाढदिवस रुग्ण सेवेशी संबंधित उपक्रमाने साजरा करण्याचा निश्‍चय संपूर्ण राज्यातील औषधी व्रिकेत्यांनी घेतला होता. त्या प्रमाणे या जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व तालुका व शहराच्या ठिकाणी रक्तसंकलन महायज्ञ झाला. जिल्ह्यातून एकाच दिवशी सर्वसाधारण किमान 2100 रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे नियोजन केल्या गेले होते. त्या प्रमाणे परभणीतील शिबीरात 393, जिंतूरात 209, सेलूत 311, पाथरीत 206, मानवतमध्ये 401, सोनपेठात 62, गंगाखेडात 110, पालम 26, पूर्णेत 52 असे एकूण 1 हजार 170 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या