🌟मराठवाडा व नरसापूर एक्सप्रेस अंशतः रद्द तर तपोवन एक्सप्रेस उशीराने धावणार🌟
नांदेड (दि.07 जानेवारी 2025) : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या रोटेगाव व परसोडा दरम्यान उद्या बुधवार दि.08 ते दि.17 जानेवारी 2025 या कालावधीत बीसीएम मशीनने रेल्वे मार्गाची देखरेख व दुरुस्ती करण्याकरीता लाईनब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस नांदेड येथून तर नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस लासूर येथून सुटणार आहे. तसेच तपोवन एक्सप्रेस उशीराने धावणार आहे.
गाडी क्रमांक 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस 9, 10,11,12,13,16,17 व 18 जानेवारी दरम्यान धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखेस ही गाडी नांदेड ते मनमाड अशी धावणार आहे. तर गाडी क्रमांक 12788 नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस 8,9,10,12,15,16 व 17 जानेवारी रोजी नगरसोल ते लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखेस ही गाडी लासूर येथून सुटणार आहे. गाडी क्रमांक 17232 नगरसोल - नरसापूर एक्सप्रेस 11 जानेवारी रोजी नगरसोल ते लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखेस ही गाडी लासूर येथून सुटेल. गाडी क्रमांक 17617 मुंबई-सीएसएमटी नांदेड-तपोवन एक्सप्रेस 10,11,12,15,16 व 17 जानेवारी रोजी मुंबई येथून 120 मिनीटे उशीराने धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली......
0 टिप्पण्या