🌟नांदेड दमरे विभागांतर्गत येणाऱ्या राजंणी व कोंडी दरम्यान दि.03 ते 09 जानेवारी पर्यंत लाईन ब्लॉक...!


🌟लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या उशिरा तर मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द🌟  

नांदेड (दि.02 जानेवारी 2024) - नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागातील व्यवस्थापक कार्यालयांतर्गत येणाऱ्या राजंणी आणि कोंडी दरम्यान दि.03 जानेवारी ते 09 जानेवारी 2025 दरम्यान चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत आणि धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

🚉 अंशतः रद्द गाडी :-

1. गाडी क्रमांक 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस दिनांक 03, 05, 06, 09 आणि 10 जानेवारी दरम्यान धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखेस ही गाडी नांदेड ते मनमाड अशी धावेल. 

🚉 उशिरा धावणाऱ्या गाड्या :-

1. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-नगरसोल एक्सप्रेस दिनांक 04, 05, 08 आणि 09 जानेवारी 2025 रोजी 90 मिनिटे उशिरा धावेल. 

2. गाडी क्रमांक 17232 नगरसोल-नरसापुर दवी-साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 04 जानेवारी 2025 रोजी 90 मिनिटे उशिरा धावेल. 

3. गाडी क्रमांक 12788  नगरसोल-नरसापुर एक्सप्रेस दिनांक 05, 08 आणि 09 जानेवारी 2025 रोजी 90 मिनिटे उशिरा धावेल. 

अशी माहिती नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयाने दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या