🌟लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराने लोकराजा शाहू महोत्सव समितीच्या वतीने सन्मानित🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य मुख्याध्यापक महासंघाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय अध्यक्ष,इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे परभणी जिल्हाध्यक्ष शिक्षक नेते डी.सी.डुकरे यांना इचलकरंजी येथे (कोल्हापूर) श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात त्यांनी आतापर्यंत शैक्षणिक,सामाजिक,वाङ्मयीन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराने लोकराजा शाहू महोत्सव समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी डी.सी.डुकरे यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड,लोकसेवा अकादमी मुंबई, मिश्कीनशहा बाबा प्रकाशन हिंगोली,मुक्ताई फाऊंडेशन बारामती,माजी आमदार दगडुजी गलांडे समितीच्या कलावतीबाई काळे वाचनालय हताळा कळमनुरी.नागरी विकास सेवासंस्था छत्रपती संभाजीनगर राज्यातील अशा विविध सेवा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.याप्रसंगी व्यासपीठावर लोकराजा शाहू महोत्सव समितीच्या अध्यक्ष प्रा.डाॅ.मिनल राजहंस,प्रकाश मोरबाळे,केदार कुलकर्णी,अक्षरा कांबळे,समितीचे सर्वेसर्वा अरुण कांबळे आदींची उपस्थिती होती.त्यांच्यासोबत मुख्याध्यापक सत्यनारायण रणवीर, मुख्याध्यापक रामराव दुगाने,सुनिल हारके आदी इचलकरंजी येथे पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित होते.......
0 टिप्पण्या