🌟राज्यातील शिक्षण क्षेत्रात सलग आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण आता यापुढे बंद....!

 


 🌟पाचवी,आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे बंद🌟

मुंबई (दि.२४ डिसेंबर २०२४) - राज्यातील शिक्षण क्षेत्रात सलग आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण आता यापुढे बंद होणार आहे सदरील धोरण अनेक राज्यांनी स्वीकारले आहे. 

या 'नो डिटेन्शन पॉलिसी' विरोधात केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. आता इयत्ता ५वी आणि ८वीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणारे विद्यार्थांना त्याच वर्गात पुन्हा बसावे लागणार आहे. त्यांना पुढच्या वर्गात ढकलेले जाणार नाही. 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द करताना नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देखील दिला आहे. नापास झालेल्या पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना पुन्हा दोन महिन्याने परीक्षा देता येणार आहे. मात्र, या परीक्षेत ते नापास झाले तर त्यांना त्याच वर्गात पुन्हा बसावे लागणार आहे. देशात तब्बल १६ राज्यात 'नो डिटेन्शन पॉलिसी' धोरण आहे. या धोरणामुळे विद्यार्थी सलग आठवीपर्यंत पास होत असल्याने शिक्षणाची गुणवत्ता राहत नसल्याची टीका केली जात होती. तसेच विद्यार्थी देखील अभ्यास गांभीर्यपूर्वक करत नसल्याचा आक्षेप नोंदवला जात होता.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या