🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सर्वोच्च न्यायालयात प्रकरण रखडले🌟
मुंबई :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर पालिका तसेच नगर पालिकेच्या निवडणुका अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत या निवडणूका केव्हा होणार या विषयी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे चुकीचे आहे सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण रखडले आहे. त्यासंदर्भात आपण कालच वकिलांशी बोललो या प्रकरणाची याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयने परवानगी दिल्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना पहिली मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर अगदी मोकळेपणाने चर्चा केली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका निवडणुकीचा प्लॅन सांगितला. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळलेल्या मोठ्या यशामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील निवडणुकींची तयारी केली जात असल्याचे संकेत दिले या निवडणुकीत राज ठाकरे यांना देखील महायुती सोबत घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत तीन मोठे पक्ष होते त्यामुळे त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हत्या त्यामुळे राज ठाकरे स्वतंत्र लढले त्यांना या निवडणुकीत मते चांगले मिळाली. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तेथे तेथे त्यांच्याशी आम्ही युती करू असे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ईव्हीएमवर होणाऱ्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ईव्हीएमवर बोलण्यापेक्षा त्यांना आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. एकाच दिवशी झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते ते झारखंडमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले असल्याचे म्हटले जाते परंतु महाराष्ट्रात पराभव झाला तर ईव्हीएमचा घोळ असल्याचे म्हटले जाते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले....
0 टिप्पण्या