🌟भारतीय सत्यशोधक महासंघाची निवेदनाद्वारे आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी🌟
छत्रपती संभाजीनगर :- परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची दि.१० डिसेंबर २०२४ रोजी विटंबना झाल्यानंतर दि.११ डिसेंबर २०२४ रोजी आंबेडकरवादी जनसमुदायाकडून या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागून झालेल्या तोडफोड जाळपोळ दगडफेकीच्या घटने संदर्भात पोलिसांनी अटकेनंतर पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीत शहिद झालेल्या भिमसैनिक ॲड.सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबास महाराष्ट्र सरकारने तात्काळ ०१ कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरीत समाविष्ट करावे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील मौजे मौजे लिमगाव येथील मातंग समाजाच्या व्यक्तींना नग्न करून अमानुष मारहाण केल्याची दुर्दैवी घडली या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करून घटनेतील आरोपींना कठोर शासन होईल या दृष्टीने पावल उचलावी अशी मागणी भारतीय सत्यशोधक महासंघाने दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
भारतीय सत्यशोधक महासंघाने छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की भारत स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्षांचा काळ लोटला असून अजूनही दलित समाजाला स्वातंत्र्य मिळालेले नाही. मागील काही वर्षांपासून दलित समाजावर अत्याचाराचे प्रकार फार जास्त प्रमाणात वाढले आहेत वेळोवेळी निवेदन देऊनही फारसा काही फरक दिसत नाही समाजाला न्याय मिळावा म्हणून लोकशाही मार्गाने रस्त्यावर येऊन आक्रोश करतो आहोत तर तेही आता सुरुक्षित वाटत नाही गावगुंड बोकाळलेले आहेत शासनाचे अधिकारी व कर्मचारी कोणाच्या तरी ईशाऱ्यावर नाचताना व खुन करणारे, बलात्कार करणाऱ्या गुंडांना पाठिशी घालताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या मौजे लिमगाव येथील मातंग समाजाच्या रंजित ससाणे व त्याचा साथीदार बाळु बालचंद घुगे यांना तीन दिवस एका खोलीत डांबुन ठेवले व नग्न करून उघड्यावर बेदम मारहाण करून त्यांना लाथा-बुक्क्यांनी मायबहिणीवर अश्लील/जातीवाचक शिवीगाळ केली ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असून प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे अजून या घटनेतील प्रमुख सुत्रधार आरोपी फरार असून पोलीस अधिकारी मात्र तपास चालू असल्याचे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करून मातंग समाजाला न्याय देण्यात यावा तसेच परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबन घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या रॅलीत शामील झालेले शाहिद भिमसैनिक ॲड.सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यूला जबाबदार असलेले पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांची चौकशी होऊन त्यांना कठोर शासन व्हावे.
जेणे करून कायद्याचे पालन करण्याची शिस्त अधिकारी वर्गाला लागेल व समाजालाही आपले प्रशासन दखल घेत असल्याचे समाधान मिळेल यामुळे शांती, सुव्यवस्था, बंधुत्व, राष्ट्रीत्व सलोख्याने टिकून राहील. तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबास ०१ कोटी रुपये आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे असे देखील भारतीय सत्यशोधक महासंघाने निवेदनात नमूद केले असून या निवेदनावर भारतीय सत्यशोधक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत शिंदे, बहुजन जनता पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष सुनील मोटे, बहुजन जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव खाजेकर,भारतीय सत्यशोधक महासंघानचे राज्य सल्लागार नागराज आईलवार, बहुजन जनता पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष जिजा गुडेकर,मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते लहु गायकवाड,बहुजन जनता पक्षाचे पैठण तालुकाध्यक्ष विशाल शरणागत, प्रबुद्ध समाज निर्माण संस्था छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष ॲड.धनेश गवळी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.......
0 टिप्पण्या