🌟कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या : सदरील घटना अत्यंत संतापजनक🌟
चंद्रपूर : मुंबईतील कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आली या अमानवीय घटनेतील आरोपी विशाल गवळी याच्यावर यापूर्वीही देखील अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना तो जामिनावर सुटला आणि पुन्हा एका बालिकेवर अत्याचार करून या नराधमाने तिचा जीव घेतला.
सदरील घटना अत्यंत संतापजनक असून यावरून राज्यातील पोलिस आणि कायदा यांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते. बदलापूर असो किंवा कल्याण,महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महायुती सरकार किती गंभीर आहे, हे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. राजगुरुनगर, पुणे येथे दोन निष्पाप बहिणींची हत्या हा देखील संतापजनक प्रकार आहे. खेळता खेळता हरवलेल्या या मुलींच्या निघृण हत्येमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गुन्हेगार निर्भयपणे वावरत आहेत, हे सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे. राज्यात महिला आणि लेकी निर्भयपणे फिरू शकत नाही इथे गुंड, बलात्कारी निर्धास्तपणे फिरत आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महायुती सरकारला जबाबदारी स्वीकारावी लागेल.
या दोन्ही घटनांतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिस आणि न्यायव्यवस्थेने ठोस पावले उचलावीत. अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करीत केली आहे.......
0 टिप्पण्या