🌟पुर्णेत सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची 112 वी जयंती उत्साहात साजरी🌟
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा व जिल्हा शाखा परभणी दक्षिण आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची 112 वी जयंती पूर्णा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षीय समारोपामध्ये शामराव जोगदंड यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांचा त्याग धम्म प्रचार आणि प्रसारासाठी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी केलेलं कार्य याचा मागोवा घेत ते म्हणाले अखेरच्या क्षणापर्यंत बौद्ध धम्म प्रचाराने प्रसाराचा कार्य त्यांनी केल.
जयंती सोहळा समारंभाचे अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड हे होते प्रमुख उपस्थिता मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य एम यु खंदारे माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानोबा जोंधळे कोषाध्यक्ष गौतम वाघमारे डॉक्टर तुप समंदर डॉक्टर साहेब गोधने केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य तुकाराम ढगे तालुका शाखेचे माजी पदाधिकारी श्रीकांत हिवाळे किशोर ढाकरगे अतुल गवळी बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे साबळे साहेब बौद्धाचार्य उमेश बारहाटे सुनील खाडे समता सैनिक दलाचे मेजर नरेंद्र सोनुले विश्वनाथ कांबळे व समता सैनिक दल व माता रमाई महिला मंडळा्ची उपस्थिती होती.
प्रास्ताविक माजी तालुका सचिव अतुल गवळी यांनी केले बौद्धाचार्य एम.यु.खंदारे श्रीकांत हिवाळे किशोर ढाकरगे रमाई महिला मंडळाच्या ज्येष्ठ सदस्य सुकेशनी ताई भुजबळ यांनी आपल्या मनोगता मध्ये सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यावर यथोचित प्रकाश टाकला.सुकेशनी ताई भुजबळ यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या सहवासातील आठवणी सांगून सर्वांना अंतर्मुख केले शीघ्र कवी व बौद्धाचार्य उमेश बारहाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर स्वरचित गीत गाऊन मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून 27 वर्षाची प्रदीर्घ सेवा पार पाडल्यानंतर सेवानिवृत्त झालेले डॉक्टर साहेब गोधने व गडचिरोली या ठिकाणचा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार व काव्य क्षेत्रातील योगदान याबद्दल मिळालेला पुरस्कार याबद्दल दोघांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या