🌟राज्यातील ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू - प्रा.टी.पी.मुंडे

 


🌟वाचाळवीरांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी थांबवावे असेही प्रा.टि.पी मुंडे म्हणाले🌟


केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही अमानवीयच या हत्येतील जे आरोपी असतील त्यांना कठोरातील कठोर शासन करावे परंतु या हत्या प्रकरणा आडून जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांना टार्गेट कोणी करत असेल तर आम्हीही महाराष्ट्रात रस्त्यावर उतरू असा गंभीर इशारा ओबीसी बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्रा.टि.पी. मुंडे यांनी परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे दरम्यान महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असलेल्या पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांच्या पाठीशी वडीलधारी म्हणून खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही ते म्हणाले.

दोन दिवसापूर्वी बीड येथे निघालेल्या मूक मोर्चा विषयी बोलताना प्रा.टी.पी. मुंडे म्हणाले की, बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या मूक मोर्चात नेत्यांनी भाषणे कसे काय केले. आणि जे भाषणे झाली ते केवळ राजकीय हेतूने प्रेरित करणारे होते. ओबीसी नेते तथा राज्याचे मंत्री असलेल्या पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांना या मोर्चाच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आले. बदनाम करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या महिला कलाकारांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत बोलणे आणि त्यांचे बदनामी करणे हे नेत्यांना शोभत नाही. यापूर्वी परळी शहरात ज्या काही हत्या झाल्या त्यावेळी हे नेते कोठे होते? त्यावेळी यांनी का आवाज उठवला नाही. कारण ते वंजारी समाजाचे होते. त्यामुळेच ते बोलले नाहीत असा आरोपही त्यांनी केला.

याप्रकरणी जे वाचाळवीर नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करीत आहेत. तसेच वाटेल ते बोलत आहेत. अशा वाचाळवीरांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी थांबवावे. आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करताना प्रा.टी.पी. मुंडे म्हणाले की, धस यांनीही १९९५ आणि २००० मध्ये कुणाची तरी हुजरेगिरी केली होती. हे त्यांनी विसरू नये. एखाद्या कार्यकर्त्यांनी कोणता गुन्हा केला असेल तर त्याला जरूर शिक्षा व्हावी. परंतु नेत्यांनाच जबाबदार धरणे योग्य नाही. बीड येथील मूक मोर्चात ज्या नेत्यांनी भाषणे केले अशा नेत्यांचा त्यांनी जाहीर धिक्कार केला. यापुढे ओबीसी नेत्यांना असेच टारगेट केले जात असेल तर जशास तसे उत्तर देऊ असेही प्राध्यापक टी पी. मुंडे म्हणाले.

दरम्यान आपण लवकरच ओबीसी नेत्यांचे एक शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे प्रा.टी.पी. मुंडे म्हणाले. या पत्रकार परिषदेला ओबीसी नेते भीमराव मुंडे, सूर्यकांत मुंडे, जि. प. सदस्य प्रदीप मुंडे आदी उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या