🌟मंत्रीमंडळ विस्तारात डावलण्यात नाराज राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले...!

 


🌟या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ या दोघांमध्ये सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली🌟

मुंबई :- राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डावलण्यात आल्याने  नाराज असलेले माजी मंत्री तथा राज्यातील जेष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज सोमवार दि.२३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ या दोघांमध्ये सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली.

राज्यातील ओबीसी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवत आपल्या पक्षाचे नेते अजित पवारांची भेट घेणे देखील टाळले आहे. या दरम्यान आज छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा केली. या भेटीनंतर भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना छगन भुजबळ म्हणाले की, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी आपले सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर निवडणुकीत आपल्याला महाविजय जो मिळाला आहे. त्यात ओबीसीचे पाठबळ जे लाभलं त्याबद्दल आभार मानले. तसेच ओबीसींचे नुकसान होणार नाही. याची मला देखील खूप काळजी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी सांगितले. या संदर्भात मला ८ ते १० दिवसांचा वेळ द्या... आपण ८-१० दिवसांत शांततेने मार्ग काढू, असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या