परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील हेळंब येथे ०७ ते ०९ डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त शनिवारी दुपारी १ वा. श्री खंडोबाची पालखी मिरवणुक निघणार आहे. रात्री ११ वाजता शोभेची दारु उडवून अतिषबाजी केली जाणार आहे व २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. रविवारी रात्री ८ ते १२ दरम्यान वाग्या मुरळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दि.०९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक २१,१०१/- ठेवण्यात आले आहे.
नवस केला की, पावतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे भाविक नवस बोलतात फळ मिळाल्यास ते नवस पूर्ण करतात. यासाठी पंचक्रोशीतील व ग्रामस्थ कितीही बाहेर असले तरी यात्रेनिमित्त ते दर्शनासाठी आवर्जून येतात. मुंबई, पुणे, छत्रपती संभजीनगर, हैदराबाद आणि अनेक राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. खंडोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे. चंपाषष्ठीला तीन दिवशीय यात्रा भरते, शनिवारी हेळंब येथील श्री हनुमान मंदिरापासुन श्री खंडेरायाच्या मुर्तीची मिरवणुक वाजत गाजत निघते, एक किलोमिटर अंतरावर असलेल्या खंडोबा मंदिरात ही पालखी येते, पुन्हा ही पालखी गावातुन जाते. या पालखी सोहळ्यात हेळंब व परिसरातील ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात. रविवारी सायंकाळी हेळंब येथे वाघ्या मुरळ्याचा कार्यक्रम घेण्यात येतो व सोमवारी कुस्त्याच्या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. तीन दिवशीय यात्रेत परळी तालुक्यातील राज्यातील अनेक ठिकाणाहुन भक्त सहभागी होतात व खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतात. या यात्रेची ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे. तीन दिवसीय यात्रेत दर्शनासाठी परळी वैजनाथ व परिसरातील ग्रामीण भागातुन भक्त मोठ्या प्रमाणात येतात. हेळंबच्या गावकरी मंडळाच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो.
💫 श्री खंडोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम :-
श्री खंडोबा मंदिर हे भव्य दिव्य आहे. खंडोबा मंदिरात प्राचीन काळापासून यात्रा भरते. मंदिरात लक्षवेधी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. या यात्रेची ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे. दिवसभर मंदिर परिसरात गावातील व परिसरातील भाविक तळीभांडार उचलणे, ओटी भरणे, भंडारा खोबरे उधळणं आदि कार्यक्रमास सुरुवात करतात व रात्री १० वाजता श्रींचा अश्वरूपी मूर्तीसह सवाद्य छबिना मिरवणूक काढून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते. यावेळी हलगीच्या तालावर खंडोबाचे वारू शिव मल्हार येळकोट. येळकोट घे च्या जय जयकारात बेभान होऊन नाचतात हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.....
0 टिप्पण्या