🌟विभागीय पोलिस महानिरीक्षक श्री उमाप याच्यासह राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या परभणीत दाखल🌟
परभणी (दि.११ डिसेंबर २०२४) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या काल मंगळवार दि.१० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या विटंबने नंतर या घटनेच्या निषेधार्थ आज बुधवार दि.११ रोजी विविध आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या दरम्यान घडलेल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी गंभीर दखल घेतली असून आज बुधवारी दुपारच्या सुमारास विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्याही परभणी शहरात दाखल झाल्या आहेत.
परभणी शहरातील मध्यवस्तीसह जिंतूर व वसमत रस्त्यावर आंदोलनकर्त्यांपैकी काहींनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या घटना दुपारी उशीरापर्यंत सातत्याने सुरुच होत्या विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालय व विसावा कॉर्नरजवळही काही छोट्या मोठ्या टपर्या उलथण्यात आल्या. दुकानांवरही दगडफेक करण्यात आली दुचाकी वाहनेही पेटवून देण्यात आली. तसेच चारचाकी वाहनांवर तूफान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असे स्पष्ट चित्र होते. त्यातच या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच कक्षात घुसून प्रचंड गदारोळ केला. कागदपत्रे भिरकावली. त्यामुळे परिस्थितीची चिघळली या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप हे आज दुपारी आवर्जून परभणीत दाखल झाले. लगेचच वरिष्ट पोलिस अधिकार्यांबरोबर चर्चा करुन त्यांनी हिंसक हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घ्यावी अश्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या त्यामुळे परभणी जिल्हा पोलिस दल कमालीचे ॲक्शन मोडवर आले असून वसमत रस्त्यासह बाजारपेठांमधून फिरणार्या व गोंधळ घालणार्या कार्यकर्त्यांना पोलिस अधिकारी-कर्मचार्यांनी चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली आहे........
0 टिप्पण्या