🌟गंगाधर डुब्बे यानां नॅशनल इन्स्पियरींग आयकॉन अवॉर्ड पुरस्कार प्रदान.....!


🌟धार्मिक व साहित्य क्षेञातील कार्याबद्दल बलसा येथील गंगाधर डुब्बे यानां नुकताच प्रदान करण्यात आला पुरस्कार🌟

पुर्णा (दि.२९ डिसेंबर २०२४) : दोडासन बाला लोअर क्लब लडाखच्या (जम्मू & काश्मीर) वतीने देण्यात येणारा वर्ष २०२४ चा "नॅशनल इन्स्पियरींग आयकॉन अवॉर्ड" धार्मिक व साहित्य क्षेञातील कार्याबद्दल बलसा येथील गंगाधर धोंडीबा डुब्बे यानां नुकताच प्रदान करण्यात आला. त्यांनी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन, साहित्य क्षेत्रात लेख,कविता आहेत. मा.मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांच्या जीवन चरित्रावर नाथसागराचे आसव काव्य संग्रह त्यांनी प्रकाशित केला आहे. अशा विविध माध्यमातून केलेल्या  कार्याची दखल घेऊन त्यांचीं या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली.

(ता.२२)रविवारी नांदेड येथील दादाराव वैद्य सभागृहात, त्यांना डॉ. हंसराज वैद्य यांच्या हस्ते सन्मान पञ, सन्मानचिन्ह, देऊन गौरविण्यात आले. यावेळी दै.सत्यप्रभाचे संपादक संतोष पंडागळे, समाजसेवक सुधाकर कदम, प्रा. लक्ष्मण कोंडावार यांची उपस्थिती होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल  त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या