🌟शाहिद भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व जेष्ठ आंबेडकरवादी नेते दिवंगत विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन व मदत🌟
परभणी (दि.३० डिसेंबर २०२४) :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळातर्फे आज ३० डिसेंबर २०२४ रोजी गेले १५ दिवस सातत्याने सुरू असलेल्या परभणीच्या पोलीस अत्याचार विरोधी धरण्याला पुन्हा जोरदार पाठिंबा देण्यात आला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबिय (आई विजयाबाई, तरुण बंधू प्रेमनाथ व अविनाश) शहीद विजय वाकोडे यांचे कुटुंबिय (पुत्र सिद्धांत व आशिष) यांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिवमंडळ सदस्य विजय गाभणे, बीड जिल्ह्याचे जातीअंत संघर्ष समितीचे राज्याचे नेते बब्रुवाहन पोटभरे, पक्षाचे राज्य कमिटी सदस्य व एसएफआय चे राज्य सचिव रोहिदास जाधव, परभणीचे नेते किर्तीकुमार बुरांडे, हिंगोली जिल्हा कमिटी सदस्य अंकुश बुधवंत, राज्य कमिटी सदस्य व परभणी जिल्हा सचिव उद्धव पौळ आणि सर्व जिल्हा कमिटी सदस्य रामकृष्ण शेरे, दत्तुसिंग ठाकूर, अशोक बुरखुंडे, रामेश्वर पौळ, दिपक लिपणे, रामराजे महाडिक, नसीर शेख, राजू दक्ष यांचा समावेश होता.
दोन्ही शहिदांना न्याय मिळावा म्हणून परभणीत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत दोघांच्या मृत्यूला आणि अनेक स्त्री-पुरुषांवर झालेल्या जबर लाठीमाराला जबाबदार असलेले पोलीस अधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी आपल्या आवाहनात केली. भाजप व महायुतीचे राज्य सरकार सत्तेत आल्यामुळेच परभणी पोलिसांना दलितांवर इतके रानटी अत्याचार करण्यास उत्तेजन मिळाले असा त्यांनी आरोप केला. याविरुद्ध परभणी जिल्ह्यात आणि राज्यभर आंदोलन तीव्र करण्याची हाक देण्यात आली.
💫परभणीत या प्रकरणाविषयी पक्षाची चांगली पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली :-
फेब्रुवारी २०२५ मध्ये पक्षाचे २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन परभणी जिल्ह्यात सेलू येथे होणार आहे. वरील कार्यक्रम पूर्ण झाल्यावर सायंकाळी या अधिवेशनाच्या तयारीसाठी पक्षाची परभणी जिल्हा कमिटी बैठक डॉ. अशोक ढवळे व विजय गाभणे यांच्या उपस्थितीत झाली व तिने तयारीच्या नियोजनाचे महत्त्वाचे निर्णय घेतले.....
0 टिप्पण्या