🌟प्रवेश घेणाऱ्या सर्व सभासदांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार🌟
परभणी (दि.२५ डिसेंबर २०२४) :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष गणेश गाढे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रभाग क्र. 12 व 16 मधील भीम नगर तथागत नगर मंत्री नगर अलिबाग नगर समृद्धी नगर येथील युवकांनी स्त्री मुक्ती दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
त्यात प्रज्ञा गजभार,अंजली वाव्हळे, युवा नेते मोहन गाढे,प्रताप पंडित, स्वप्निल जगताप,आशिष गायकवाड,श्रमिक भदर्श,योगेश पंडित, आशिष भावे,विष्टू कांबळे,सचिन शिंदे,तुषार जगताप,चंद्रकांत उबडे,राहुल झोडपे,रोहन वाघमारे,अभिषेक नंदनवरे,अथर्व आदमारे,आशिष भाने,सुमित पंडित,मयुर कांबळे, ऋषिकेश सावने,अतिश हजारे,आशिष उबाळे,आदर्श गायकवाड,अजय खिल्लारे, गोरख शिंदे, किशोर साळवे आदींनी पक्ष प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती महाराज, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता ताई साळवे, युवा जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, लातूर निरीक्षक सिद्धोधन सावंत , युवा जिल्हा उपाध्यक्ष गणेश गाढे, दिगंबर घुगे तालुका अध्यक्ष मानवत,गंगाखेड महिला तालुकाध्यक्ष अश्विनी मुजमुले, परभणी तालुकाध्यक्ष प्रमोद अंभोरे, तालुकाध्यक्ष कमलेश ठेंगे, माला साळवे,सविता सोनटक्के, छाया खरात यांच्या उपस्थित पार पडला. प्रवेश घेणाऱ्या सर्व सभासदांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. व पुढील कार्याच्या शुभेच्छा ही देण्यात आले आहेत.....
0 टिप्पण्या