🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट,पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या🌟

✍️ मोहन चौकेकर

💫 मुंबईतील कुर्ला बस अपघातातील मृतांचा आकडा 7 वर, 48 ते 50 जण जखमी, अपघातानंतर बेस्ट चालक संजय मोरेवर आक्रमक जमावाचा हल्ला;पण पोलिसांनी धाडस दाखवत सहीसलामत बाहेर काढलं ; मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; जखमींवरील उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्याचे आदेश ; चालकाने मद्यपान केल होतं अस कुठही निदर्शनास आलं नाही, पोलिसांच्या अहवालात देखील असं कुठंही नमूद नाही; बेस्ट बसचे महाव्यवस्थापक अनिल दिग्गीकर यांचा खुलासा 

💫नोकरीचा पहिला दिवस अन् घरी परतताना घात झाला, कुर्ल्यातील बस अपघातात आफरिन शाहने जीव गमावला ; ज्या रुग्णालयात नोकरीला, त्याच्यासमोरच अपघात; मुलाचं लग्न बघण्यापूर्वीच आईने डोळे मिटले, सर्व गहिवरले! 

💫आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची पुण्यातून अपहरण करुन हत्या ; मामाचा खून,  स्मशानातूनच आमदार योगेश टिळेकर पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, सामान्य माणूस असो किंवा आमदारांचा मामा असो शेवटी ही यंत्रणा आहे, पोलीस तपास सुरु आहे ; काळ्या मातीत राबणारे अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय काही कळेना ? 

💫बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट,पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या,मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच ; सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, पोलिसांनी आरोपी पकडले आणि त्यांना लगेच जामीन कसा मिळाला, एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री असताना असं झालं नव्हतं; खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया

💫इन्स्टाग्रामवर मैत्री करुन ब्लॅकमेल केलं, जालन्यात तरुणाच्या जाचामुळे नैराश्यात गेलेल्या 17 वर्षीय मुलीने गळ्याला दोर लावला 

💫धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंनी माळशिरसमधील सभेतून दिलं आव्हान ; 100 शकुनी मेल्यावर 1 शरद पवार जन्मला, गोपीचंद पडळकर यांची मारकडवाडीतील ईव्हीएमच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेतून घणाघाती टीका ; सुप्रिया सुळे आणि निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा द्यावा, त्याशिवाय EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल 

💫उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका  

💫महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम आणि VVPAT मधील मतमोजणीत कुठेही तफावत नाही, निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी 

💫देश बहुसंख्यांकांच्या इच्छेनुसार चालेल हायकोर्टाचे न्या.शेखर कुमार यादव यांचे वक्तव्य ; सुप्रीम कोर्टाकडून दखल ; बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार, संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संतापले; म्हणाले, हे पाकिस्तानमध्ये झाले असते तर इंडिया गेट समोर उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले असते 

💫राहुलने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर परत जावे आणि रोहितने डावाची सुरुवात करावी, ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर यांचा रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला 

स्टेअरिंग गरागरा फिरवायची सवय असणाऱ्या संजय मोरेंच्या हातात इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टिअरिंग आलं अन् घात झाला ? समोर स्पार्क झाला, गाडीने स्पीड पकडला अन् नियंत्रण सुटले; बेस्टचा ड्रायव्हर संजय मोरेने अपघातावेळी नेमकं काय घडले सांगितले                               

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या