🌟परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: सराफ व्यापाऱ्यांकडून लुटलेले दागदागिने घेतले ताब्यात...!


🌟मानवत पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवून इंद्रायणी माळ परिसरातून चोरट्यांकडून घेतले ताब्यात🌟 

परभणी (दि.२० डिसेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील उमरी येथील सराफा व्यापार्‍याकडून लुटलेले सोन्या-चांदीचे दागदागिणे मानवत पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवून इंद्रायणी माळ परिसरातून जप्त केले.

             मानवत तालुक्यातील भोसा येथील वशिष्ट शिवाजीराव जाधव यांनी मानवत पोलिस स्ठाथानकात काल गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री एक तक्रार दाखल केली या तक्रारीत त्यांनी असे नमूद केले की मी उमरी येथील दैनंदिन व्यापार आटोपून दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने घेवून कारने आपल्या भोसा या गावी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी कारला मोटारसायकलद्वारे धडक दिली कार थांबवून आपण नुकसानीची पाहणी करत असतांना अज्ञात चोरट्यांनी रॉडने मारहाण करण्याची धमकी दिली व आपल्या कार एम.एच.२२ ए.डब्लू ७९८८ या कार मधील सोन्या-चांदीचे दागिणे असलेली बॅग पळवली त्यात अंदाजे ०४ लाख ५० हजार रुपयांचे दागिणे होते असे म्हटले.

             दरम्यान मानवत पोलिसांनी या प्रकरणात नोंद केली गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर, बीट अंमलदार भारत नलावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. लगेचच या दोघांसह महेश रणेर, पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, विकास मोरे, शफीक शेख, गोविंद वड, शेख मुन्नु, सुनील बावरी, सिध्देश्‍वर पाळोदे, मुजीब व पोलिस पाटील प्रधान यांनी तात्काळ तपास सुरु केला. तेव्हा आज शुक्रवार दि.२० डिसेंबर रोजी पहाटे ०५.०० वाजेच्या दरम्यान इंद्रायणी माळ परिसरातून पोलिसांनी चोरीस गेलेले ते सोन्या-चांदीचे दागदागिणे जप्त केले दरम्यान या घटने संदर्भात तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक खिल्लारे पुढील तपास करीत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या