🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या......!


🌟छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणे म्हणजे ओबीसी चळवळीवर अन्याय - काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार 

✍️ मोहन चौकेकर

मंत्रिमंडळातून डावललेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मला मंत्रिपद मिळणार नाही असं कधीच सांगितलं नाही; मी नाराज असण्याचे कारण नाही; पक्षाने जे आदेश दिले, जी जबाबदारी दिली ती पार पाडणार नितीन गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला,त्यांना मंत्रिपद दिलं,कालपर्यंत माझं नाव होतं ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुधीरभाऊंशी प्रदीर्घ चर्चा झाली होती; सुधीर मुनगंटीवार थेटच म्हणाले, ते प्रदीर्घ वगैरे काही बोलले नाहीत 

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज,राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली,अधिवेशन सोडून नाशिकला रवाना 

मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळाले,डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल 

छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणे म्हणजे ओबीसी चळवळीवर अन्याय, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया 

आमची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले,सदाभाऊ खोतांची मंत्रिपद न मिळाल्यानं खंत 

माझ्याशी कुणी संपर्क करू नये,मला बोलायचं त्यावेळी बोलेन ; तानाजी सावंतांकडून निवेदन,मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक 

कुणीतरी बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेल बरं, नाराज असल्याच्या चर्चेवर दिपक केसरकरांची बोलकी प्रतिक्रिया 

अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले  

नाराज नरेंद्र भोंडेकरांनी पक्षाची पदे सोडली,विजय शिवतारेंचा हल्लाबोल,शिंदेंचे आमदार राजेंद्र गावित देखील मंत्रिपद न दिल्याने नाराज

संजय राठोडांसोबत आमदारकी उपभोगताय,दुटप्पी,हलकट प्रवृत्तीवर न बोललेलं बरं,सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर हल्ला 

बीडच्या मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणाचे पडसाद विधीमंडळात,  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभागृहात थेट वाल्मिक कराड यांचे नाव घेतले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, AI वापरु, कारवाई करु! 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींची पुरवणी मागणी,लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटींचा निधी 

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा, नव्या सरकारला आवाहन 

परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल 

परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश 

परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

अकोल्यात मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार 

फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार 

तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांना देशविदेशातून आदरांजली,अमेरिकेतील रुग्णालयात अखेरचा श्वास ; ग्रॅमी अवॉर्ड्स, पद्म विभूषणनेही सन्मान, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या झाकीर हुसैन यांची डोळे दिपवणारी कारकीर्द! 

 ✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या