🌟 महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या १५ डिसेंबर रोजी....!


🌟मंत्रीमंडळाचा विस्तारात भाजपचे २३ तर शिवसेना शिंदे गटाचे १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे ९ मंत्री घेणार शपथ🌟

मुंबई (वृत्त विशेष) :- महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर नव्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार व नवीन मंत्रिमंडळात कोणाकोणाची मंत्रीपदावर वर्णी लागणार,नवीन मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कोणती खाती मिळणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं परंतु सातत्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने अनेकांना धाकधूक लागली होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मतदारांनी  स्पष्ट बहुमत दिलं त्यानंतर भाजप आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागली ०५ डिसेंबर रोजी नवीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला परंतु राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र रखडला होता तब्बल दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता उद्या रविवार दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

💫राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली : रविवारी दि.१५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा होणार विस्तार :-

दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे ३४ ते ३५ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे २३ मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे १३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ९ मंत्री असणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपचे १७ शिवसेनेचे १० आणि अजित पवार गटाचे ७ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच यावेळी गृह आणि अर्थ असे दोनही महत्त्वाची खाती असणार आहेत.

💫भाजपाचे संभाव्य मंत्री :-

चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा + योगेश सागर, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, गोपीचंद पडळकर

💫शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दादा भुसे उदय सामंत, शंभूराज :-

देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या