🌟सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याही स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली🌟
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी, दि. एकोणीस रोजी सकाळी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याही स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर,विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यासह सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे शिंदे गटातील अनेक आमदार उपस्थित होते. या सर्वांनी हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरएस- एसच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली......
0 टिप्पण्या