🌟आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.चंद्रशेखर आजाद गुरुवार दि.०२ जानेवारी रोजी परभणी व नांदेड दौऱ्यावर...!


🌟शहीद सोमनाथ सूर्यवंशी व आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेते स्व.विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची देखील खा.चंद्रशेखर आझाद🌟

परभणी :- आजाद समाज पार्टी भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांचे गुरूवार दि.०२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे तेथून लागलीच खा.आझाद हे परभणीकडे मोटारीने प्रयान करणार आहेत.

परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची देखील खा.चंद्रशेखर आझाद हे भेट घेणार आहेत तसेच आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेते विजय वाकोडे यांचे निधन झाले त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची देखील सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यानंतर परभणी येथून नांदेड येथे येणार आहेत नांदेडमध्ये भीम आर्मी व आजाद समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक वायवळे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते, आजाद समाज पार्टीचे जिल्हा महासचिव विलास वाळकीकर, युवा जिल्हाध्यक्ष योगेश सोनाळे, विद्यार्थी आघाडीचे मिथुन वाघमारे यांनी आवाहन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या