🌟मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे भ्रष्ट गुत्तेदारांना पाठीशी घालून भ्रष्ट बेईमानशाहीचा उत्कर्ष साधणार काय ? नागरिक प्रश्नार्थक मुद्रेत🌟
पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहराच्या विकासासाठी राज्य शासनासह केंद्र शासनाकडून देखील कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाला परंतु भ्रष्ट अधिकारी बेईमान गुत्तेदार व काही आजी/माजी तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधींनी बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामांना प्राथमिकता देऊन शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची अक्षरशः धुळधाण केली नगर परिषदेचे पुर्व मुख्याधिकारी पौळ यांच्या कार्यकाळात शहरातील विविध प्रभागांमध्ये निरर्थक ठिकाणी सन २०२३/२४ या वर्षात जवळपास तीस पस्तीस कोटींची निकृष्ट व बोगस विकासकाम करण्यात आली.
पुर्णा नगर परिषदेचे पुर्व मुख्याधिकारी पौळ यांच्या बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आलेले मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या काळात तरी पुर्णा नगर परिषदेच्या कारभारात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु ही अपेक्षा संपूर्णतः फोल ठरल्याचे निदर्शनास येत असून शहरातील विविध प्रभागांमध्ये आज देखील बोगस व निकृष्ट दर्जाची विकासकाम करुन शासकीय विकासनिधीची सोईस्करपणे विल्हेवाट लावली जातांन पहावयास मिळत असून शहरातील प्रभाग क्रमांक ०६ मधील सम्राट अशोक नगर येथे लाखों रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून सिमेंट रस्त्यासह सिमेंट नालीचे बांधकाम सुरू असुन या सिमेंट नाली व सिमेंट रस्त्याच्या कामाकडे पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व नगर अभियंता अब्दुल हकीम यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने संबधित गुत्तेदार या सिमेंट रस्ते व सिमेंट नालीचे बांधकाम माती मिश्रीत रेती व निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरून करीत असल्यामुळे लाखो रुपयांच्या शासकीय विकासनिधी अक्षरशः माती होतांना पाहावयास मिळत आहे.
सम्राट अशोक नगर परिसरात होत असलेल्या या सिमेंट रस्त्याखालून खालुन जाणारी नगर परिषद पाणीपुरवठा विभागाची पाईप लाईन फुटलेली असताना देखील संबंधित भ्रष्ट गुत्तेदार व पडद्यामागील तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी अर्थात पडद्यामागील गुत्तेदार सिमेंट रोड व सिमेंट नालीचे बोगस काम तसेच रेटून पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतांना नगर अभियंता अब्दुल हकीम कुंभकर्णी झोपेत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून लाखो रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून होत असलेल्या या सिमेंट रस्त्याचे काम करण्यापुर्वी नगर परिषद नगर अभियंता अब्दुल हकीम यांनी प्रथमतः पाणीपुरवठा करणारी ही फुटलेली पाइपलाइन बदलणे आवश्यक होते परंतु तसे नकरता बोगस व निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता व सिमेंट नाली बांधकाम करुन लाखो रुपयांचे बिल तात्काळ कसे उचलता येईल या दिशेने वाटचाल सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून सम्राट अशोक नगरात नगर परिषदेकडून अक्षरशः शेत शिवारातील पांदन रस्त्यागत बोगस सिमेंट रस्त्याची निर्मिती होतांना पाहावयास मिळत आहे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे भ्रष्ट गुत्तेदारांना पाठीशी घालून भ्रष्ट बेईमानशाहीचा उत्कर्ष तर साधणार नाही ? असाही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे........
0 टिप्पण्या