🌟महिला आयोगाचे पोलिसांना कार्यवाही अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश🌟
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह बेताल वक्तव्या संदर्भात त्यांनी आमदार धस यांच्या बद्दल राज्य महिला आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केली होती अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केलेल्या तक्रारीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित पोलिसांना दिले आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या तक्रारीची दखल घेत हा तक्रार अर्ज मुंबई पोलीस कार्यालय, बीड जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक व अर्जाची एक प्रत सायबर क्राइम विभागाला पाठवण्यात आल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली दरम्यान प्राजक्ता माळी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांची तपासणी व्हावी आणि त्यावर कारवाई व्हावी असे निर्देश पत्राद्वारे राज्य महिला आयोगाने सायबर क्राइम विभागाला दिले आहेत तसेच संबंधित तक्रारअर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा तक्रार अर्ज राज्य महिला आयोगाला शनिवारी दुपारी प्राप्त झाला. गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये विविध यूट्यूब चॅनल, पेज आणि अश्लील भाषेतील कमेंट्स यांची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे प्राजक्ता माळी हिने तक्रार दाखल केली.
💫आमदार सुरेश धस यांच्याकडून झालेल्या चारित्र्यहननामुळे प्राजक्ता माळी कुटुंबाला मनस्ताप :-
या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, या कमेंट्समुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्य व करिअरवर परिणाम झाला आहे. चारित्र्यहनन करणाऱ्या वक्तव्यांमुळे प्रचंड मनस्ताप कुटुंबाला झाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सनी केलेल्या बातम्यांमुळे मला अतिशय वेदना झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाने या सगळ्याची दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाला केली आहे.
💫आमदार सुरेश धस यांनी अखेर मागितली जाहीर माफी...!
🌟दिलगिरी व्यक्त करण्यात काही वाईट नाही लहान होण्यात मला माझ्या आयुष्यात कधी कमीपणा वाटलेला नाही - आ.सुरेश धस
बिड : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे मन दुखावले असल्यास मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो अर्थात माफी मागतो असे भाजप आमदार सुरेश धस यांनी काल सोमवारी सांगितले आमदार सुरेश धस यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की प्राजक्ता माळी यांचे मन किंवा इतर कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. दिलगिरी व्यक्त करण्यात काही वाईट नाही, लहान होण्यात मला माझ्या आयुष्यात कधी कमीपणा वाटलेला नाही. हा विषय संपवून टाका.
0 टिप्पण्या