🌟या प्रशिक्षणाला आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे वडील अंकुशराव पाटील यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली - महिला आरोग्य प्रशिक्षण हा नावीन्य पूर्ण उपक्रम संविधान दिनाच्या निमित्ताने कुटुंब कल्याण आरोग्य विभाग, केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य मंत्री मा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात सुरु केला त्या अनुषंगाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगर परिषद रुग्णालय येथे महिला आरोग्य समिती प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणाला आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे वडील अंकुशराव पाटील यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले तसेच युवा नेते कैलास भालेकर जिल्हा नियोजन समिती सदस्य यांनी सुद्धा भेट दिली व मार्गदर्शन केले. या वेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत रुग्णालयातील कर्मचारी यांनी केले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा आहे की देशातील महिलांना आरोग्य सेवा क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे त्या दृष्टीने भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे.एक कोटी कुटुंबाची आरोग्य प्रकृती परीक्षण करण्याचा उद्देश असलेला हा उपक्रम आरोग्य सुविंधाच्या सर्वसामावेशकतेचा आदर्श उदाहरण ठरेल. या मोहिमेची जागतिक पातळीवरील ग्रीनीज बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद होत आहे.हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीचा आणि प्रगतीचा गौरव आहे.आरोग्य सुधारणा, सामाजिक विकास,आणि आर्थिक स्थेर्य या साठी शेवटच्या घटका पर्यंत आरोग्य सेवा पोहचवीणे हा या अभियानाचा मूलभूत आधार आहे.सामान्य नागरिकांच्या व महिलांच्या आरोग्य समस्या ओळखून त्या सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे ही या मोहिमेची जमेची बाजू ठरली आहे. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी संपूर्ण आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांनी अथक परिश्रम घेतले......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या