🌟नांदेड येथील शिख बांधवांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन🌟
नांदेड (विशेष वृत्त) :- धर्म,संस्कृती आणि मानवतेचे रक्षक शिख पंथाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचे जीवन, योगदान आणि बलिदान आपणा सर्वांना माहीत आहे त्यांचे वडील व शिख पंथाचे नववे गुरु श्री तेग बहादूर साहीबजी यांनीही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले होते हे पाहता हजूर साहेब नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तिथीनुसार साजरे होणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा प्रकाश पर्वा निमित्त महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सुट्टी जाहीर करण्याच्या दिशेने तात्काळ पाऊल उचलावी येत्या काळात दि.०६ जानेवारी २०२५ रोजी श्री गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचे प्रकाश पर्व तिथीनुसार साजरे केले जाणार असल्याने या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि.०६ डिसेंबर २०२४ रोजी नांदेड येथील शिख बांधवांनी पाठवलेल्या निवेदनात केली आहे
असेही निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील,नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंडारकर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर,नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत,नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक यांना देखील पाठवण्यात आल्या असून या निवेदनावर शिख समाजातील प्रतिष्ठित नागरिक सामाजसेवी स.लखनसिंघ लांगरी, जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक स.रविंदरसिंघ मोदी,सामाजिक कार्यकर्ते स.लड्डूसिंघ काटकर,स.गुरमीतसिंघ टमाना,स.तेजिंदरसिंघ धुपिया,स.तेगासिंघ बावरी,सरिंकुसिंघ आदी मान्यवराच्या स्वाक्षरी आहेत......
0 टिप्पण्या