🌟पुष्पा २ : द रुल' या चित्रपटाचा देश विदेशात धुमाकूळ.....!


🌟चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत केली ८ दशलक्ष डॉलर्सची कमाई🌟

सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट गुरूवार ५ डिसेंबर २०२४ पासून + थिएटरमध्ये दाखल झाला आणि तेव्हापासूनच तो बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन रेकॉर्ड बनवत आहे. हा चित्रपट देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. पुष्पा २' ने जागतिक स्तरावर अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

विशेषतः उत्तर अमेरिकेत या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ८ दशलक्ष डॉलर्सची कमाई करून ऐतिहासिक आकडा पार आहे. रविवारपर्यंत (दि.८) हा आकडा एक कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुष्पा २: द रुल' या चित्रपटाने तेलुगू आणि हिंदी या दोन्ही आवृत्त्यांमध्ये उत्तर अमेरिकन बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या सिनेमासाठी भाषा हा अडथळा नाही हे यातून सिद्ध झाले आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता हा चित्रपट लवकरच अनेक नवे रेकॉर्ड बनवू शकतो असे दिसते. याआधीही अनेक भारतीय चित्रपटांनी उत्तर अमेरिकेत धुमाकूळ घातला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या