🌟रशियानं कर्करोगावर बनवली लस : रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी दिली माहिती दिली🌟
✍️ मोहन चौकेकर
संपूर्ण जगात सध्याच्या काळात कॅन्सर - कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. अशात रशियाने संपूर्ण जगाला दिलासा देणारी बातमी दिली आहे. रशियाने सांगितले की, त्यांनी कॅन्सर-कर्करोगाची लस तयार केली आहे, जी रशियातील सर्व नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असेल. रशियन आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले की, त्यांनी कॅन्सर- कर्करोगाविरूद्ध लस विकसित केली आहे, जी 2025 च्या सुरुवातीपासून रशियामधील कॅन्सर - कर्करोगाच्या रुग्णांना मोफत दिली जाईल. रशियन सरकारी मालकीची वृत्तसंस्था TASS नुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी या लसीबद्दल माहिती दिली आहे.
मॉस्कोमधील गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झेंडर गिंट्सबर्ग यांनी यापूर्वी TASS ला सांगितलं होतं की, ही लस ट्यूमरची वाढ रोखू शकते आणि कर्करोगाचा प्रसार रोखू शकते. ही लस सर्वसामान्य लोकांना दिली जाणार नाही. केवळ कॅन्सर कर्करोग झालेल्या रुग्णांच्या उपचासाठी या लसीचा वापर केला जाणार आहे रशियन नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटर आणि गामालेया नॅशनल रिसर्च सेंटरसह रशियन आरोग्य मंत्रालयाने या लसीबाबत पुष्टी केली आहे. तसेच लस कशी कार्य करते, हेही स्पष्ट केलं आहे. मात्र ही लस कोणत्या कॅन्सर कर्करोगावर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा या लसीला काय म्हटलं जाईल, याबाबत अजून कोणतीही स्पष्टता जाहीर करण्यात आली नाही मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी या फार्मास्युटिकल कंपन्या सध्या त्वचेच्या कर्करोगाच्या लसींवर काम करत आहेत......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या