🌟 पुण्यातील साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार राज्यस्तरीय पुरस्कार🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पत्रकार सचिन ज्ञानेश्वर सोनकांबळे यांना पुणे येथील साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर झाला असून हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सचिन सोनकांबळे यांना दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात दुपारी १२.०० ते ०४.०० वाजेच्या सुमारास आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे येथील साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशनच्या वतीने पत्रकार सचिन ज्ञानेश्वर सोनकांबळे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की देशाच्या प्रगतीसाठी व राष्ट्राच्या हितासाठी सामाजिक उज्वल भवितव्यासाठी आपण अनेक क्षेत्रात गेल्या काही वर्षातील आपण केलेल्या सामाजिक कार्य सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन. आम्ही साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. तसेच सर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने... आपल्या कार्य कर्तुत्वाला प्रोत्साहित करण्याचे कार्य करीत आहोत... पुरस्कार प्रेरणा देतात. प्रेरणेने राष्ट्र मोठे होते..! या सूत्रावर आधारित. राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार कार्य प्रति आपणास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आपणास आम्ही वरील फाउंडेशनच्या माध्यमातून २०२४. करिता पुरस्कार जाहीर करीत आहोत. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..! आपणास तरी आपण या समारोह प्रसंगी आपण आपल्या सहकुटुंब व मित्र परिवारासह सोबत उपस्थित राहुन सदर कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती असेही पत्रात नमूद करण्यात आले असून त्यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.....
0 टिप्पण्या