🌟पुर्णेतील श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्था व महाविद्यालयातर्फ डॉ.विनय वाघमारे यांचा सत्कार.....!


🌟याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष मा. उत्तमरावजी कदम यांची उपस्थिती होती🌟

पुर्णा (दि.२४ डिसेंबर २०२४) - पुर्णा शहरातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या विद्या प्रसारणी सभा शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.विनय दत्तात्रेय वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली याबद्दल श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने आज मंगळवार दि.२४ डिसेंबर रोजी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष मा. उत्तमरावजी कदम यांची उपस्थिती होती, डॉ. विनय वाघमारे हे पूर्णा परिसरात वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व असून त्यांच्या रूपाने संस्थेला लाभलेले अध्यक्ष निश्चित संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील राहतील त्यांच्या वैद्यकीय सेवेचा वारसा शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोलाचा ठरेल. डॉ. विनय वाघमारे यांचा सत्कार करून माजी प्राचार्य मनोहर सोनटक्के श्री राजेश धुत,श्री अनील डुब्बेवार व श्री संतोष एकलारे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप संस्थेचे सचिव अमृतराज कदम यांनी केला, यावेळी मंचावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, ज्येष्ठ संचालक श्री साहेबराव कदम, तसेच सहसचिव प्रा. गोविंदराव कदम यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. व्यंकट कदम यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी, विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या