🌟पुर्णा शहरातील नगर परिषदेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात संविधान गौरव सोहळ्या निमित्त बैठक संपन्न....!


🌟यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तम भैय्या खंदारे हे होते🌟


पुर्णा (दि.२९ डिसेंबर २०२४) :- पुर्णा शहरातील नगर परिषदेच्या क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले सभागृहात आज रविवार दि.२९ डिसेंबर रोजी येणाऱ्या प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य संविधान गौरव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा प्रतिवर्षी आयोजित होणाऱ्या संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाश दादा कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा भुषण तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गटनेते उत्तम भैय्या खंदारे हे होते प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा तमाम बहुजन समाजाचे लढवैय्ये नेतृत्व व संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाश दादा कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते.

यावेळी संविधान गौरव सोहळा समितीचे मुख्य सयोजक प्रकाश दादा कांबळे यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब,रेल्वे कामगार नेते अशोक कांबळे,जाकिर कुरेशी,माजी नगरसेवक अनिल खर्गखराटे,माजी नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड़,वंचित बहुजन आघाड़ी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड़,भिमशक्ती संघटनेचे चक्रवर्ती वाघमारे, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे श्रीकांत हिवाळे सर,आदिची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बैठकीच्या सुरुवतीस परभणी येथील शाहिद भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी,जेष्ठ आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्यासह बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे निर्घृण हत्या करण्यात आलेले सरपंच संतोष देशमुख यांना दोन मिनिट स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात अली.सदर बैठकीत उपस्थितांकडून सविधान गौरव सोहळ्या विषयी विविध मुद्दे मांडण्यात आले येत्या प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य संविधान गौरव सोहळ्यास विविध वक्त्यांची नावे यावेळी सूचित करण्यात आली शाहिद विजय वाकोडे यांना शासनाच्या वतीने एक कोटी रुपये मदत मुख्यमंञी निधीतून मदत देण्यात यावी अशी मागणी समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे  करण्यात येणार असल्याचे सविधान गौरव आयोजक प्रकाशदादा कांबळे यानीं सांगितंले या बैठकीत शहरातील विविध स्तरातील संविधान प्रेमी उपस्थित होते....‌

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या