🌟अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली🌟
नागपूर : महाराष्ट्र राज्यातील तीस जिल्ह्यातील ३० हजार ५१५ गावातील नागरिकांसाठी २७ डिसेंबरला स्वामित्व योजना सुरू होणार आहे. त्याअंतर्गत नागरिकांना संपत्तीचे मालमत्ता पत्र (ई- प्रॉपर्टी कार्ड) मिळतील. योजनेमुळे सामान्यांची संपत्तीबाबतची फसवणूक थांबेल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपुर येथील प्रेसक्लबमध्ये बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशभरात २७ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजता सदर योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने होईल. या कार्यक्रमाला महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री राज्यातील विविध जिल्ह्यातून सहभागी होतील. नागपुरातील मी स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले....
0 टिप्पण्या