🌟या संदर्भात शिवाजीनगर पोलिस स्थानकात तीन ते चार अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल🌟
नांदेड (दि.१९ डिसेंबर २०२४) - तुम्हाला बिर्याणी खायची की नाही असे म्हणून अनोळखी तीन ते चार जणांनी दोघांना मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवार दि.१७ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आंबेडकरनगर येथे घडली.
या घटनेतील फिर्यादी तथा विद्यार्थी धिरज प्रकाश सोनकांबळे (रा. अरुणोदयनगर, तरोडा) व अन्य एकजण मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता आंबेडकरनगर येथे आला होता. त्यावेळी अनोळखी तीन ते चार जणांनी तुम्हाला बिर्याणी खायची की नाही असे म्हणून धिरज सोनकांबळे याचा हात धरुन त्याचे डोके भिंतीवर आपटले. या प्रकारात तो गंभीर जखमी झाला. त्या तीन-चार जणांनी धिरज सोबतच्या व्यक्तीला देखील लाकडाने डोक्यात मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात धिरज सोनकांबळे याने शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तीन ते चार अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोउपनि कदम हे पुढील तपास करीत आहेत......
0 टिप्पण्या