🌟नांदेड येथील तख्त सचखंड हुजुर साहिब येथे शाहिद दिनानिमित्त वाहिगुरू सिमरन संपन्न....!


🌟दशमेशपिता साहीब श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराजांचे साहिबजादे व माता गुजरीजी यांच्या शहीदी दिनानिमित्त सिमरन संपन्न🌟 


नांदेड (दि.28 डिसेंबर 2024) - दशमेशपिता साहीब श्री गुरु गोबिंद सिंघजी महाराजांचे साहिबजादे आणि माता गुजरीजी यांच्या शहादतेस समर्पित 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:45 ते 11:00 या वेळेत तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे आदरणीय मुख्य जत्थेदार सिंघ साहिब भाई कुलवंत सिंघ जी आणि पंज प्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनात गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे १५ मिनिटे "वाहिगुरु" सिमरन करण्यात आला. यानंतर तख्त साहिबचे सहाय्यक जत्थेदार सिंघ साहिब भाई राम सिंघ जी यांनी चार साहिबजादे, माता गुजरीजी आणि शहीद सिंघांच्या शहादतेस समर्पित अरदास केली.

यावेळी तख्त साहिबजीच्या पंजप्यारे साहिबांसह शालेय विद्यार्थी, गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी, हजुरी आणि देश-विदेशातील भाविकांनी मोठ्या संख्येने "वाहिगुरु" सिमरन नामजप करून आपली श्रद्धा व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या