🌟परभणीत उद्या मंगळवार दि.०३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन....!


🌟या भव्य रॅलीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे हिरवी झेंडी दाखविणार आहेत🌟

 परभणी (दि.०२ डिसेंबर २०२४) : परभणी शहरात उद्या मंगळवार दि.०३ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातून मोठी रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.के.भोजने यांनी दिली.

               या भव्य रॅलीत सर्व दिव्यांगांच्या शाळा,कर्मशाळेतील विद्यार्थी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १०.०० वाजता ही रॅली निघणार असून त्यास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे हिरवी झेंडी दाखविणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विसावा कॉर्नर, नारायण चाळ कॉर्नर, जिल्हा परिषद नूतन इमारत, महात्मा फुलेे पूर्णाकृती पुतळा, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल मार्गे या रॅलीचा जिल्हा क्रिडा संकुलात समारोप होणार आहे. यावेळी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशिल जाधव यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या