🌟पुर्णेत मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी द्वारा आयोजित परभणी जिल्हा अजिंक्यपद क्रॉसकंट्री स्पर्धा उत्साहात संपन्न....!


🌟या स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंची राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेत निवड झाली आहे🌟


पुर्णा (दि.१५ डिसेंबर २०२४) - पुर्णेत आज रविवार दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी येथील मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने परभणी जिल्हा अथलेटीक असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या परभणी जिल्हा अजिंक्यपद क्रॉसकंट्री स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाल्या असून या स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंची राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेत निवड झाली आहे.


पुर्णेतील मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित परभणी जिल्हा अजिंक्यपद क्रॉसकंट्री स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अभिनव विद्या विहार प्रशालेचे प्रशासक दिलीप माने तर स्पर्धेचे उदघाटन म्हणून श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचे सचिव अमृतराव कदम तर प्रमुख अतिथी म्हणुन  दै.सकाळ वृत्ताचे तालुका प्रतिनिधी जगदीश जोगदंड तर प्रमुख पाहुणे म्हणून दै.लोकमत वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी देसाई, तलाठी गणेश गोरे,राजेश पिंडगे,सुनिल घाटगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर या स्पर्धेस मार्गदर्शन म्हणून पूर्णेतील जेष्ठ क्रीडा शिक्षक प्राचार्य अंबादास काळे,जेष्ठ क्रीडा शिक्षक वसंत कऱ्हाळे,तालुका क्रिडा संयोजक धरमसिंग बायस, प्रा.सतीश बरकून्टे,जेष्ठ क्रीडा शिक्षक अनिल उकरंडे,क्रिडा शिक्षक जावळे सर,क्रिडा प्रशिक्षक शंभू गायकवाड, प्रा.डॉ.राहुल कांबळे, श्री. विलास चव्हाण मैदानी प्रशिक्षक आदी उपस्तिथ होते. 


या स्पर्धेसाठी पंच म्हणून जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे कैलास टेहरे,यमनाजी भालशंकर,संतोष पोले,अमोल नंद,गजानन भालेराव,गोविंद काजळे,बालाजी मानोलीकर,तुकाराम कल्याणकर तर स्पर्धा पायलट म्हणून कुंदन ठाकूर,मच्छिन्द्रनाथ भोसले,मुगाजी साळुंके,अरबाज पठाण, धारेश्वर सोळंके, आकाश परडे,साई भंगे, अर्जुन कदम,रामेश्वर कदम,योगेश दळवी,संघरत्न ढगे,आदिनी काम पहिले तर स्पर्धा चेक पॉईंट पंच म्हणून अविनाश पाटील,विष्णू गुप्ते,सुरेश बागटे,शेख अरबाज,अविनाश पानोडे,विष्णू बोकारे आदींनी काम पहिले असून या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या स्पर्धेकास गोल्ड मेडल,सिल्वर मेडल,ब्रॉन्झ मेडल देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेचे सूत्र संचलन श्री.शिवप्रसाद देवणे तर आभार प्रा डॉ. महेश जाधव यांनी केले.


 *16 वर्ष आतील मुले*

प्रथम - अनन्या विनोद जावळे, 

द्वितीय. प्रदमन तुकाराम गायकवाड

तृतीय -राजेश बाळू बेले 

*18 वर्ष अतील मुले*

प्रथम - सोपान शरद पावर 

द्वितीय - शेख साद शेख सलीम

तृतीय - प्रथमेश ज्ञानेश्वर वाघमारे 

*२० वर्ष आतील मुले*

प्रथम - पावर प्रतीक सुनिल द्वितीय - वैभव बालाजी तरंगे तृतीय - सुरज केशव भालेराव 

*खुला गट मुले*

प्रथम - मोहन कृष्णा चाटे

द्वितीय -  विशाल भगवान अवचाळ 

तृतीय - जाधव वैजनाथ राजेभाऊ 

*16 वर्ष आतील मुली*

प्रथम - माही जगन्नाथ कऱ्हाळे 

द्वितीय - स्नेहल सदाशिव शिंदे 

तृतीय - ऋतुजा पांडुरंग जोगदंड 

*२० वर्ष आतील मुली*

प्रथम - शीतल शंकर साखरे द्वितीय - मनीषा दिलीप मुळे तृतीय -ऋतुजा शिवचरण जाधव 

*खुला गट मुली*

प्रथम - मयुरी गौतम ढगे 

या सर्व विजयी विद्यार्थ्यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्य क्रॉसकन्ट्री स्पर्धे करिता निवड झाली आहे या स्पर्धाचे समन्वयक *प्रा.डॉ.माधव शेजूळ जिल्हा सचिव अथलेटिक असोसिएशन परभणी,प्रा.डॉ.गुरूदास लोकरे,प्राचार्य रणजित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या अशी माहिती मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक प्रा.डॉ. महेश जाधव यांनी दिली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या