🌟पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे अहों नगर परिषद प्रशासन कुठवर पोसणार भ्रष्ट बेईमान गुत्तेदार अन् चोट्टे ?


🌟कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी जणू त्यांना वाटतोय स्वतःच्या खिशातले पैसे सुट्टे ?🌟


पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे अहों नगर परिषद प्रशासन कुठवर पोसणार भ्रष्ट बेईमान गुत्तेदार अन् चोट्टे ? कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी जणू त्यांना वाटतोय स्वतःच्या खिशातले पैसे सुट्टे ? अशी एकंदर परिस्थिती शहरातील विविध भागांमध्ये झाल्याचे निदर्शनास येत असून पुर्व मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या बदलीनंतर पुर्णा नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभारात देखील बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु पुर्णा नगर परिषदेचे नुतन मुख्याधिकारी म्हणून उत्कर्ष गुट्टे यांनी पदभार स्विकारल्यानंतर मात्र भ्रष्टाचाराचा उत्कर्षच झाल्याचे पाहावयास मिळत असून विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे काही दिवस थांबलेली निकृष्ट व बोगस विकासकामांची मालिका आचारसंहिता संपताच पुन्हा जोमाने सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे.


पुर्णा शहरातील सम्राट अशोक नगर मस्तानपुरा परिसरात मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व नगर अभियंता अब्दुल हकीम यांच्या खंबीर पाठबळाने भ्रष्ट बेईमान गुत्तेदार व तत्वभ्रष्ट आजी/माजी/भावी लोकप्रतिनिधींनी अक्षरशः बोगस व निकृष्ट विकासकामांचा नग्न तांडव सुरू केल्याने पाहावयास मिळत असून लाखों रुपयांचे सिमेंट रोड व सिमेंट नाल्या अंदाजपत्रकांवर लघूशंका करीत मागील पक्क्या सिमेंट रोडवर गिट्टी अंथरुण त्यावर खडी मशीनवरील डस्ट/मातीयुक्त वाळू व निकृष्ट सिमेंटचे कालवण करुन त्यावर टाकून जगाच्या विपरीत अजब गजब पध्दतीने सिमेंट रोडची निर्मिती त्याच निकृष्ट व बोगस सिमेंटचा आधार घेऊन सिमेंट नाल्यांची निर्मिती या भ्रष्ट बेईमान गुत्तेदारांकडून केली जात असतांना मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व नगर अभियंता अब्दुल हकीम अंध धृतराष्ट्राप्रमाणे या कौरवकृत्यांचे समर्थन करीत आहेत काय ? असा गंभीर प्रश्न पुर्णेतील जनसामान्यांतून उपस्थित होतांना दिसत आहे.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या