🌟त्यांच्या लेवा खानदेशी भाषेतील कविता व ओव्या🌟
✍️ मोहन चौकेकर
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म महाराष्ट्रातील असोडे (जळगाव) गावात 24 ऑगस्ट 1880 रोजी झाला. हे गाव खान्देशातील जळगावपासून 6 किमी अंतरावर आहे. त्याच्या आईचे नाव भीमाई होते. त्याला घमा, घाना आणि गण नावाचे तीन भाऊ आणि अहिल्या, सीता, तुलसा नावाच्या तीन बहिणी होत्या. बहिणाबाईंचा वयाच्या 13 व्या वर्षी (1893) खंडेराव चौधरीचा मुलगा नथुजीशी विवाह झाला. त्याला ओंकार, सोपानदेव नावाची दोन मुले आणि काशी नावाची मुलगी होती.
त्यांच्या संपूर्ण जन्मात निरक्षर राहिल्या, म्हणून तिने गायलेल्या कविता शेजाऱ्यांनी लिहिल्या आणि काही कविता नष्टही झाल्या. मराठी असल्याने त्या “लेवा गणबोली” या भाषेत लिहायच्या. त्या अशिक्षित होत्या, पण तिच्याकडे काव्यात्मक जीवनाची प्रतिभा आहे, ज्यात तिचे शेतीचे काम, घरातील कामे, विभक्त झाल्यानंतर मुलीचे आयुष्य हे सर्व तिच्यामध्ये आहे. हे सर्व ऐकून त्याचा मुलगा सोपानदेव आणि त्याचा चुलत भाऊ दोघेही जमेल तसे लिहायचे.
महाराष्ट्रातील कवी सोपानदेव बहिणाबाईंचा मुलगा होता. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर सोपानदेव आणि तिचे चुलत भाऊ पितांबर चौधरी या दोघांकडे “बहिणाबाईची गनी” हस्तलिखित स्वरूपात होती. सोपानदेवाने या कविता आपल्या गुरु आचार्यांना अत्रे यांना दाखवल्या, गुरु आचार्य अत्रे म्हणाले की हे तर बावनकशी सोने आहे! महाराष्ट्रापासून ते लपवणे हा गुन्हा आहे आणि त्या कविता प्रकाशित करण्याचे वचन दिले.
बहिणाबाईंच्यां कविता विशेषतः तिच्या मातृभाषेवर अवलंबून आहेत, तिच्या कवितांचा विषय आहे पिहार, जग, शेतीचे साहित्य, तिचे काम इत्यादी कृषी जीवनातील विविध घटना, पोळा, गुढीपाडवा इत्यादी सणांचा समावेश आहे. देव आपल्या जीवनात कसे उपस्थित आहे, सूर्य, वारा, पाणी, आकाश, भगवान श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये उपस्थित आहेत, अशा प्रकारे ते त्यांच्या कविता मध्ये लिहितात.
बहिणाबाईंच्या कविता
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर,
किती हाकला हाकला फिरी येते पिकावर.
मन जह्यरी जह्यरी त्याचे न्यारेच तंतर,
अरे इचू साप बारा त्याले उतारे मंतर.
पृथ्वीवरचा सर्वांत हुशार आणि बुद्धिमान प्राणी मानव आहे. त्याला बोलता येते, वाचता येते आणि विचारही करता येतो. इतके असूनही अनेकजण आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळतांना आपल्याला दिसतात. एका सुगरण पक्ष्याचे उदाहरण घेऊन किती सुंदर विचार बहिणाबाई मांडतात.
अरे खोप्या मंदि खोपा सुगरणीचा चांगला,
देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला.
तिची उलूशीच चोचं, तेच दात तेच ओठ,
तुले देले रे देवाने, दोन हात दहा बोटं.
बहिणाबाईंच्या रचना या खानदेशातील लेवा गण बोलीतील आहेत. बोलीभाषेत त्या रचना असल्यामुळे त्यात गावरान गोडवा आणि आपलेपणा आपसूकच जाणवतो.
धरीत्रीच्या कुशीमंदी बीयबियानं निजली,
वऱ्हे पसरली माती जशी शाल पांघरली.
शेतात पेरणी झाल्यानंतर बियाणं जमिनीत निजण्याची आणि मातीची शाल पांघरल्याची कल्पना बहिणाबाईंनी किती सुंदररित्या मांडली.
मानसा मानसा कधि व्हशील माणूस,
लोभासाठी झाला मानसाचं रे कानूस
आयुष्य जगात असतांना तुम्ही कसं जगायला हवे आणि तुम्ही कसे असायला हवे ते ह्या रचनेत किती सरळ मांडतात…
बिना कपाशीनं उले, त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले, त्याले तोंड म्हनूं नहीं
नही वार्यानं हाललं, त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम, त्याले कान म्हनूं नहीं
निजवते भुक्या पोटीं, तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं, त्याले हात म्हनूं नहीं
बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे “लेवा गणबोली” तील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा मुलगा ( ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई श्रीमती पद्माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबाईंच्या नातसून ) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालेल आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे.
आज बहिणाबाईं चौधरींच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारं, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईं चौधरींच्या वस्तूंचं, आठवणींचंच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचं दर्शन घेतात. बहिणाबाईं चौधरींच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाबाई चौधरी नातं जोडतात. त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने पहावं असं हे बहिणाबाईं चौधरींचे संग्रहालय आहे
💫 बहिणाबाई चौधरी यांचा कविता संग्रह :-
महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, “अहो हे तर बावनकशी सोनं आहे.
हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे”,आणि आचार्य अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.आचार्य अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंचे चौधरी हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.
💫 कवितांचे विषय :–
बहिणाबाईं चौधरींच्या कविता खान्देशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.
💫 काव्य रचनेची वैशिष्ट्ये :-
लेवा गणबोली (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. खानदेशातील आसोदे हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.
उदा० ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत.
‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके – तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे – आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे – तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे बहिणाबाई चौधरी सांगून गेल्या आहेत.
‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे हे बावनकशी सोने आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या