🌟पुर्णा येथील प्रा.प्रदिप कदम यांना नॅशनल इन्स्पिरींग आयकॉन अवॉर्ड पुरस्कार जाहीर.....!


🌟पुरस्काराचे वितरण रविवार दि.२२ डिसेंबर रोजी वजिराबाद नांदेड येथील दादाराव वैद्य सभागृहात दुपारी होणार🌟 

पुर्णा (दि.२० डिसेंबर २०२४) - दोडासन बाला लोअर क्लब लडाख(जम्मु अॅन्ड काश्मीर)च्या वतीने देण्यात येणारा वर्ष 2024 चा 'नॅशनल इन्स्पिरींग आयकॉन अवॉर्ड' सामाजिक व शैक्षणिक क्षेञातील उल्लेखनीय कार्याबद्दल येथील प्रा.प्रदिप सिताराम कदम यांना जाहिर करण्यात आला आहे.

मराठवाडय़ातील ग्रामीण भागात अनेक विविध सेवाभावी कार्यातून शिक्षण व सामाजिक क्षेञात त्यांनी व्याख्याने,आरोग्य शिबीर,शैक्षणिक साहित्य वाटप,स्पर्धात्मक मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमाचा माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचीं या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे या पुरस्काराचे स्वरुप सन्मान पञ,सन्मानचिन्ह स्नेंहवस्ञ व ग्रंथ असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे या पुरस्काराचे वितरण रविवार दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी नादेंड शहरातील वजिराबाद येथील दादाराव वैद्य सभागृहात दुपारी ०२.०० वाजता आयोजित कार्यक्रमात होणार आहे.

याच्या या यशाबद्दल पुर्णेचे माजी नगराध्यक्ष व जेष्ठ नेते श्री.उत्तमराव कदम जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.मोहनराव मोरे, सचिव सौ.रजनीताई भगत (मोरे) प्राचार्य नानासाहेब भालेराव,पञकार जगदीश जोगदंड पाटील,विजय बगाटे,अतुल शहाणे, प्रा. पंडीत रणवीर श,गंगाधर सोनटक्के प्रा.उत्तम मोरे,प्रा.सतिश भालेराव,बबन बगाटे,प्रकाश महाजन,सुनिल पारवे,दत्तात्रेय गंगोञे बबन पारवे ,सत्यम खंडागळे,संदिप विश्वासराव,देवानंद भारती,मारोती मुडे आदिनी त्याचे अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या