🌟बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी प्रशांत देशमुख, वसीम शेख यांची नियुक्ती🌟
✍️ मोहन चौकेकर
बुलढाणा :- मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी गुड इव्हिनिंग सिटीचे सर्वेसर्वा रणजीतसिंग राजपूत यांची अविरोध निवड करण्यात आली. तर सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्षपदी प्रशांत देशमुख व वसीम शेख यांचीही सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. 29 डिसेंबर रोजी बुलडाणा येथील पत्रकार भवनात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदी चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सूचक म्हणून गजानन राऊत यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी रणजीतसिंग राजपूत यांचे नाव सुचवले. तेव्हा सर्वांनी एकमताने त्यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला. मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी रणजीतसिंग राजपूत, सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, वसिम शेख, चिटणीस यशवंत पिंगळे, महिला जिल्हाध्यक्ष मृणाल सोमनाथ सावळे, सोशल मिडीया प्रमुख संजय जाधव, उपाध्यक्ष संतोष लोखंडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारांच्या हक्कासाठी मराठी पत्रकार परिषद लढा देत आहे. 83 वर्षाचा इतिहास असलेली मराठी पत्रकार परिषद ही एकमेव जुनी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांची एकजूट दिसून येते.
‘जगाच्या पाठीवर’ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणार्या अनेक संघटना असतील, मात्र सुरुवातीपासून मराठी पत्रकार परिषद अतिशय पारदर्शकपणे व प्रामाणिकपणे पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहे. नुकतेच ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांचा कार्यकाळ संपल्याने मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे यांची निवड झाली. जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारणी गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती. दरम्यान, रविवारी पत्रकार भवन येथे यासंदर्भात बैठक झाली. याप्रसंगी अधिस्विकृतीधारक पत्रकार समितीचे विभागीय सदस्य राजेंद्र काळे, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, डिजीटल मिडीया परिषदचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रणजीतसिंग राजपूत गेल्या 24 वर्षांपासून पत्रकारिता करीत आहे. निर्भीड, निपक्ष पत्रकारितेसाठी ते जिल्ह्यात प्रसिद्ध असून, त्यांनी स्वकर्तृत्वातून जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे. त्यांचे निवडीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. पत्रकार भवनासमोर फटाक्यांची अतिषबाजी करून नवनियुक्त पदाधिकार्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* 6 जानेवारीला पत्रकार भवनात आरोग्य शिबीर :-
पत्रकार दिनानिमित्त 6 जानेवारीला पत्रकार भवन बुलडाणा येथे सर्व पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी अॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेद क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. 6 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शिबीराला सुरूवात होणार आहे. तरी सर्व पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या