🌟परभणीत संबोधी अकादमी तर्फे खासदार शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त वसतिगृहातील मुलींना ब्लँकेटचे वाटप..!


🌟जेष्ठ नेते खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भीमराव हत्तीअंबीरे यांचा कौतुकास्पद उपक्रम🌟

परभणी (दि.१४ डिसेंबर २०२४) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त काल शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी भीमराव हत्तीअंबीरे यांच्या वतीने येथील संबोधी मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहातील मुलींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

             या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते विजय वाकोडे,डॉ.सिध्दार्थ भालेराव,रवि सोनकांबळे, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, मिलींद सावंत, संजय सारणीकर, भीमप्रकाश गायकवाड, डी.आर.तूपसुंदर,भगवान जगताप, सिद्धार्थ भराडे, लहाने, इंगळे आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना ज्येष्ठ नेते वाकोडे म्हणाले की, खा. शरदचंद्र पवार यांनी फुले - शाहू -आंबेडकर यांच्या विचाराचे राजकारण केले आहे. ते एक दुरदृष्टीचे नेते आहेत.  विशेषतः सत्तेचा विचार न करता पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर केले, याची आठवण करुन दिली.

             डॉ. सिद्धार्थ भालेराव म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत खा. पवार यांचा फार मोठा वाटा आहे, असे म्हटले. तसेच थंडीच्या दिवसात ब्लँकेट वाटप करून आयोजक हत्तीअंबीरे यांनी मायेची उब दिली आहे, असेही ते म्हणाले. सोनकांबळे म्हणाले की, खा. पवार  हे देशाचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीअंबीरे  यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. त्यांच्या या वाटचालीत आपण सतत त्यांच्या सोबत असेल. प्रमुख अतिथी सावंत म्हणाले की, खा. पवार यांनी कृषिमंत्री असताना शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना राबवल्या आहेत, सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे.

            यावेळी हत्तीअंबीरे यांनी प्रास्ताविकातून संबोधी अकादमीच्या माध्यमातून आम्ही सतत विविध सामाजिक उपक्रम राबवत आलो आहोत, असे नमूद करीत खासदार पवार यांनी सामाजिक एकतेसाठी सतत संघर्ष केला आहे. संविधान रक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे, असे म्हटले. सूत्रसंचलन नवनाथ जाधव यांनी तर आभार शेषराव जल्हारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत हत्तीअंबीरे, अविनाश मालसमिंदर, भगवान मानकर, ममता पाटील, स्वप्ना कीर्तने, रामप्रसाद घुगे, बाबासाहेब भराडे, संतोष भराडे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, अनिरुद्ध धरपडे आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या