🌟हिंसाचाराच्या घटनांमध्ये २ हिंदूंसहीत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला🌟
बांग्लादेश देशाची राजधानी ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिरावर गुरुवारी रात्री जवळपास २०० धर्मांध राक्षसी प्रवृत्तीच्या भयंकर जमावानं हल्ला केला मंदिरावर हल्ल्यासोबतच तोडफोड करण्यात आली. यादरम्यान मंदिरात उपस्थित असलेल्या काही जणांना मारहाण करण्यात आल्याचंही समोर येतंय यात अनेक जण जखमी झालेत स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार लाल मोहन साहा रोडवर असलेल्या मंदिरावर हा हल्ला करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास २०० हून अधिक जणांचा घोळका जबरदस्तीनं मंदिरात घुसला आणि त्यांनी मंदिराची तोडफोड करायला सुरूवात केली या जमावाचं नेतृत्व धर्मांध दहशतवादी प्रवृत्तीच्या हाजी सैफुल्ला यानं केल्याचं सांगण्यात येतंय मंदिरात तोडफोडीसोबतच लुटमारीचंही वृत्त आहे.
इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलंय. या प्रकरणात बांगलादेश सरकारनं कठोर कारवाई करावी आणि देशातील हिंदू अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करावी अशी विनंती आम्ही करत आहोत असं रादारमण दास यांनी म्हटलंय.बांगलादेशात कट्टरतावाद्यांकडून हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागच्या वर्षी नवरात्रीच्या काळात दुर्गापूजा मंडपांवरही हल्ले करण्यात आले. यासोबतच अनेक मंदिरांवरही अतिरेक्यांनी हल्ले केले. यावेळी इस्कॉन मंदिरालाही लक्ष्य करण्यात आलं. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये २ हिंदूंसहीत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला.
गेल्या वर्षीही बांगलादेशात ५० हून अधिक अल्पसंख्यांकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले होते. यासोबतच चार मंदिरांचीही तोडफोड करण्यात आली. खुलना जिल्ह्यात घडलेल्या लाजिरवाण्या घटनेत अनेक देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात हिफाजत ए इस्लाम या कट्टरपंथी संघटनेचं नाव समोर आलं होतं. या कट्टरपंथी संघटनेचे संबंध पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय'शी जोडले जातात.....
0 टिप्पण्या